अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 7 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करावी
- Get link
- X
- Other Apps
अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक
7 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करावी
वाशिम, दि. 14 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार यादया तयार करण्याचा कार्यक्रम जाहिर केला आहे. पदवीधर मतदारसंघासाठी दरवेळी नव्याने मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे. यावेळी मतदार नोंदणीचा कालावधी 1 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान आहे. मतदार नोंदणीसाठी आवश्यक पात्रता तो भारताचा नागरीक असावा, मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी असावा, 1 नोव्हेंबर 2022 रोजी किमान तीन वर्ष आधी भारतातील मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी किंवा समकक्ष पदवी प्राप्त पदवीधर असावा.
मतदार नोंदणीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज क्रमांक 18 सोबत रहिवासी पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, वीज-पाणी-गॅस जोडणीचे देयक ग्राहय धरण्यात येईल. विद्यापिठ किंवा संबंधित संस्था यांनी दिलेले पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका, समकक्ष पदवी प्रमाणपत्र, कागदपत्रातील नावात बदल असल्यास राजपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, संबंधित कायदेशिर पुरावा आदी कागदपत्रांची प्रत स्वयंसाक्षाकिंत व पदनिर्देशित अधिकाऱ्याकडून अधिप्रमाणित करुन जोडणे आवश्यक आहे. अर्ज क्रमांक 18 हा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांचे संकेतस्थळ, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसिल कार्यालयात उपलब्ध आहे. तरी पात्र पदवीधरांनी विहीत पध्दतीने मतदार नोंदणी करावी. जेणेकरुन त्यांना अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावता येईल. असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment