बाल कामगार आढळल्यास 1098 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन



बाल कामगार आढळल्यास

1098 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन

      वाशिम, दि. 07 (जिमाका) : राज्यात काही जिल्हयात धनगर/ मेंढपाळाकडे आदिवासी कातकरी समाजाच्या पालकांची लहान मुले बालमजूरी करीत असल्याचे आढळून आले आहे. शेळी-मेंढी पालन, शेतीत विशेषतः उसतोड, विटभट्टी इत्यादी उद्योगात/ कामाच्या ठिकाणी बाल कामगार काम करीत असल्याचे आढळल्यास बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम १९८६, सुधारणा २०१६, कलम ३ व ३ (अ) नुसार फौजदारी गुन्हा ठरतो. संबंधीत मालक, मुख्य मालक, कंत्राटदार यांच्याविरुध्द या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. कलम १४ नुसार संबंधीत मालक, मुख्य मालक, कंत्राटदार दोषी आढळल्यास ६ महिने ते २ वर्ष किंवा २० हजार ते ५० हजार रुपये किंवा दोन्ही शिक्षेची तरतुद आहे.

         जिल्हयातील सर्व आस्थापनाधारकांनी आपल्या आस्थापनेवर बाल कामगार कामावर ठेवू नये. बाल कामगार काम करीत असल्याचे आढळुन असल्यास १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे यांनी केले आहे.

                                                                                                                                        *******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे