जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने रेखाताई राष्ट्रीय विद्यालयात बालीका दिन साजरा
- Get link
- X
- Other Apps
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने
रेखाताई राष्ट्रीय विद्यालयात बालीका दिन साजरा
वाशिम, दि. 19 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्त वतीने नुकतेच वाशिम येथील रेखाताई राष्ट्रीय विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिवसाच्या निमित्ताने कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी होते. जिल्हा विधिज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. डी. आर. कलवार, अॅड. जी. एस. अवस्थी, माजी आमदार भिमराव कांबळे, प्राचार्य एस.पी. भालेराव व रेखाताई राष्ट्रीय विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे संचालक लुंबिनी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. टेकवाणी यांनी उपस्थितांना बालिका दिवसाचे महत्व विषद करुन बालिकांसंबधीत असणाऱ्या कायद्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. श्रीमती पी.एल. वैरागडे यांनी बालिका दिवस या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. अँड. जी. व्ही. मोरे यांनी बालिकांचे अधिकार व कायदे या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. संचालन व आभार संदिप भांदुर्गे यांनी मानले. कार्यक्रमाला रेखाताई राष्ट्रीय विद्यालय व ज्युनिअर कॉलेज शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थीनी आणि शिक्षकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधि सेवा समितीचे अधिक्षक एस.एन.भुरे व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment