पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते जिल्हा स्त्री रुग्णालयातील अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृहाचे उदघाटन
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते जिल्हा स्त्री रुग्णालयातील अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृहाचे उदघाटन
वाशिम दि.21(जिमाका)पालकमंत्री संजय राठोड यांनी आज 21 ऑक्टोबर रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट दिली. पालकमंत्र्यांच्या आगमनप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विजय काळबांडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार ऍड.किरणराव सरनाईक,आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस,सहायक जिल्हाधिकारी मिन्नू पी.एम,वैद्यकीय अधिकारी डॉ. कावरखे,डॉ.लोणकर,डॉ.हरण यांचेसह अन्य वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.राठोड यांनी स्त्री रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर जिल्हा नियोजन समितीच्या सन 2021 -22 च्या 4 कोटी 5 लक्ष रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या तीन अत्याधुनिक शस्त्रक्रियागृहाचे फित कापून उद्घाटन केले.या शस्त्रक्रियागृहामुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील स्त्री रुग्णांना मोठी सुविधा उपलब्ध झाल्याचे मत पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले.
Comments
Post a Comment