क्रीडा संस्कृती संवर्धनासाठी माहिती उपलब्ध करुन दयावी जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन
- Get link
- X
- Other Apps
क्रीडा संस्कृती संवर्धनासाठी माहिती उपलब्ध करुन दयावी
जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन
वाशिम, दि. 04 (जिमाका) : विभाग व जिल्हा या अंतर्गत येणाऱ्या सर्व क्रीडा संस्था/मंडळे/संघटना/ क्लब/ क्रीडा संस्कृती संवर्धन मंडळे इत्यादी सर्वांच्या मदतीने क्रीडा संस्कृती संवर्धन करण्याबाबत विभाग व जिल्हास्तरीय शहराचा स्पोर्ट हयुमन रिसोर्सेस डाटा एकत्रित करुन क्रीडा बायोडाटा करण्यात येणार आहे. याकरीता जिल्हयात असणाऱ्या प्रत्येक क्रीडा घटकांची नोंद घेवून त्यांना पुढे सहकार्य करता करण्यात येईल. या संस्कृतीबाबत उपाययोजना व कार्यवाही करण्यासाठी ही संपूर्ण माहिती क्रीडा विभागाकडे संकलीत करावयाची आहे. तरी आपल्याकडे असलेल्या सर्व क्रीडा विषयक संसाधना सोबत प्रत्यक्ष खेळणारे खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक उपलब्ध व क्रीडा सुविधा आवश्यक याबाबतची माहिती विहीत नमुन्यात तयार करुन ठेवावी.
जिल्हयातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, अध्यक्ष, सचिव, विविध खेळ संघटना, क्रीडा संस्था व क्रीडा मंडळे यांनी नोंद घेवून आपली माहिती संकलीत करुन एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावी. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले आहे.
| ******* |
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment