महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या लाभार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून पुष्प देऊन सत्कार

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 

प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या लाभार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून पुष्प देऊन सत्कार 
 
वाशिम दि.20 (जिमाका) महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.
      या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण  जिल्ह्यातील प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या लाभार्थ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात उपस्थित राहून बघितले. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस आणि जिल्हा उपनिबंधक दिग्विजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. 
    जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांच्या हस्ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कामकाज उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल पंकज दिवनाळे यांचा तसेच भटउमरा येथील दामोदर काळे व इंदुबाई उमाळे,कारली येथील शरद देशमुख, सावरगाव (बर्डे) येथील दिलीप शेळके,खरोडा येथील महादेव ठाकरे या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 
        दिवाळीच्या आधी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 50 हजार रुपये लाभाची रक्कम जमा झाल्याने निश्चितच शेतकऱ्यांना आनंद झाला आहे.अशी भावना श्री.षण्मुगराजन यांनी यावेळी व्यक्त केली.कार्यक्रमाला जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रोत्साहनपर योजनेची रक्कम जमा झाल्याचा संदेश उपस्थित अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाला.त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.उपस्थित शेतकऱ्यांनी यावेळी तो संदेश जिल्हाधिकारी यांना आवर्जून दाखविला.सर्व शेतकरी बंधूंनी आधार क्रमांकाचे प्रमाणिकरण करण्याचे आवाहन यावेळी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात  आले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे