पालकमंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ
- Get link
- X
- Other Apps
पालकमंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते
आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ
वाशिम, दि. 21 (जिमाका) : पालकमंत्री श्री. संजय राठोड यांच्या हस्ते आज 21 ऑक्टोबर रोजी वाशिम शहरातील वार्ड क्र. 3 मधील आर.डी. चव्हाण यांच्या स्वस्त धान्य दुकानातून दिवाळीच्या निमित्ताने शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वस्तु वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार ॲड. किरणराव सरनाईक, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्हयातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब योजना, एपीएल (केसरी) शेतकरी योजनेतील लाभार्थी अशा एकूण 2 लक्ष 52 हजार 736 शिधापत्रिकाधारकांना दिवाळी निमित्ताने रवा, चनादाळ, साखर व पामतेल प्रत्येकी 1 किलो याप्रमाणे देण्यात येणार आहे. आनंदाचा शिधा एक दिवाळी किट प्रति शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीव्दारे प्रति संच 100 रुपये दराने संबंधित लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. जिल्हयातील 776 स्वस्त धान्य दुकानातून या किटचे वितरण करण्यात येणार आहे. ज्या पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा संच प्राप्त होणार नाही त्यांनी जिल्हा पुरवठा कार्यालयातील 07252-233652 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे. आजच्या या शिधा वाटप शुभारंभ प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना किटचे वितरण करण्यात आले. यावेळी पुरवठा विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच संबंधित स्वस्त धान्य दुकानाचे लाभार्थी उपस्थित होते.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment