पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्तेसेवा पंधरवडानिमित्त 363 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व धनादेशाचे वितरण



पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते

सेवा पंधरवडानिमित्त 363 लाभार्थ्यांना    

 प्रमाणपत्र व धनादेशाचे वितरण

        वाशिम, दि. 21 (जिमाका) : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात आला. यादरम्यानच्या विविध योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश व प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज 21 ऑक्टोबर रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आले. यावेळी आमदार ॲड. किरणराव सरनाईक, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे, सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम. यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

          या पंधरवडानिमित्त विविध विभागाकडे जिल्हयातील नागरीकांचे प्रलंबित असलेले पोर्टलवरील तसेच प्रत्यक्ष आलेले अर्ज व तक्रारी निकाली काढण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले होते. यादरम्यान जिल्हयात 1 लक्ष 50 हजारपेक्षा जास्त पोर्टलवरील तसेच प्रत्यक्ष आलेले अर्ज व तक्रारी निकाली काढण्यात आले.

         आज झालेल्या कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कार्य करणाऱ्या संत गाडगेबाबा बचाव व शोधपथक, सर्वधर्म मित्र मंडळ कारंजा व श्रीमती साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालय, वनोजा या तीन स्वयंसेवी संस्थांच्या 18 प्रतिनिधींना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. रक्तदान शिबीराचे आयोजन करणाऱ्या 12 संघटनांच्या प्रतिनिधींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. 36 दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून 20 घरकुल लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी घराच्या चाव्या देण्यात आल्या. 20 असंघटीत कामगारांना ई-श्रमकार्ड, 8 आदिवासी शेतकरी बांधवांना शेती उपयोगी साहित्याचे धनादेश देण्यात आले. तहसिल कार्यालय, रिसोडच्या वतीने 10 प्रमाणपत्र, तहसिल कार्यालय मंगरुळपीर 18 लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत निवड झाल्याबाबत प्रमाणपत्र व शिधापत्रिका वाटप करण्यात आले. वाशिम तहसिल कार्यालयाकडून 32 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व नैसर्गिक आपत्ती निधी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आला.

          कौशल्य विकास विभागाच्या वतीने स्टार्टअप यात्रेतील 3 यशस्वी उमेदवारांना प्रमाणपत्र व धनादेश देण्यात आले. समाज कल्याण विभागाच्या वतीने 5 लाभार्थ्यांना घरकुल मंजूरी आदेश, 3 गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत एका लाभार्थ्यांला जमीन वाटपाचा आदेश देण्यात आला. महिला आर्थिक विकास महामंडळाकडून 6 बचतगटांना कर्जाचे धनादेश वितरीत करण्यात आले. 5 लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटप करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राकडून 27 लाभार्थ्यांना विविध उद्योग व्यवसायाबाबतचे प्रमाणपत्र व शिधापत्रिका, तहसिल कार्यालय मालेगांवकडून 21 शिधापत्रिका, 19 जात प्रमाणपत्र, 5 नॉन क्रिमीलियर प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजनेच्या 5 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, महाराष्ट्र ग्रामीण जिवन्नोनती अभियानांतर्गत कार्यरत 11 गटांना कर्ज मंजूरी प्रमाणपत्र व धनादेशाचे वितरण, 3 अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र, तहसिल कार्यालय कारंजाकडून विशेष सहाय्य योजनेच्या 2 लाभार्थ्यांना, एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या वारसांना धनादेश, 1 अधिवास प्रमाणपत्र, तहसिल कार्यालय मानोराकडून 4 अधिवास प्रमाणपत्र व 7 शिधापत्रिकांचे वितरण, भूमि अभिलेख विभागाकडून 17 लाभार्थ्यांना सनदचे वाटप आणि 30 लाभार्थ्यांना कृषी विभागाकडून विविध कृषीविषयक साहित्य व विविध किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी व जिल्हयातील विविध योजनांचे लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे यांनी मानले.         

 

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे