ग्रा.पं. सार्वत्रिक निवडणूक 16 ऑक्टोबर रोजी कामगारांना मिळणार पगारी सुट्टी
- Get link
- X
- Other Apps
ग्रा.पं. सार्वत्रिक निवडणूक
16 ऑक्टोबर रोजी कामगारांना मिळणार पगारी सुट्टी
वाशिम, दि. 14 (जिमाका) : महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 हा कायदा सर्व जिल्हयाकरीता लागू झाला आहे. जिल्हयातील खाजगी आस्थापनेतील दुकाने इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञाने कंपन्या, शॉपिंग सेंटर, कारखाने, चित्रपटगृहे, मॉल्स, रिटेलर्स आदी आस्थापनेतील कामगारांना 16 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. कोणताही कामगार मतदानापासून वंचित राहू नये याकरीता सर्व आस्थापना धारकांनी आपल्या आस्थापनेत कार्यरत सर्व कामगारांना पुर्ण पगारी सुट्टी देऊन त्यांना मतदान करण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment