शालेय क्रीडा स्पर्धा ऑनलाईन प्राथमिक नोंदणी आवश्यक
- Get link
- X
- Other Apps
शालेय क्रीडा स्पर्धा
ऑनलाईन प्राथमिक नोंदणी आवश्यक
वाशिम, दि. 04 (जिमाका) : जिल्हयातील सर्व कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक शाळा, वरिष्ठ प्राथमिक शाळा जिल्हा परिषद सन २०२२-२३ या वर्षातील तालुकास्तर ते जिल्हा शालेय क्रीडा १४, १७, व १९ या वयोगटाच्या मुले व मुलींकरीता एकूण ९३ खेळांच्या स्पर्धेची सुरुवात लवकरच होणार आहे. क्रीडा अधिकारी कार्यालयाने क्रीडा स्पर्धा टुर्नामेंट सॉफ्टवेअर आज्ञावली washim.mahadso.co.in/
क्रीडा स्पर्धेची प्रक्रिया ही ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. त्यामुळे क्रीडा स्पर्धामध्ये काही महत्वाचे बदल असल्यास ते ऑनलाईन तसेच वर्तमानपत्राच्या माध्यमातून कळविण्यात येणार आहे. ज्यांना शालेय खेळामध्ये सहभाग नोंदवायचा आहे, त्यांनी ऑनलाईन प्राथमिक नोंदणीची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. ज्यांची ऑनलाईन प्राथमिक नोंदणी प्रक्रिया पुर्ण झाली आहे त्यांनी तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी संबंधीत खेळाच्या ऑनलाईन प्रवेशिका किमान पाच दिवस अगोदर ऑनलाईन पध्दतीने तयार करावी. त्याची एक प्रत कार्यालयात स्पर्धेच्या पूर्वी सादर करणे बंधनकारक आहे. वेळेवर येणाऱ्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही. ज्या मान्यता प्राप्त क्रीडा संघटनेमार्फत स्पर्धेची आर्थीक व तांत्रीक बाजू सांभाळून स्पर्धा आयोजन करण्यास तयार आहे त्याच स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात येईल. अधिक माहितीकरीता कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले आहे.
| ******* |
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment