6 ते 8 ऑक्टोबरपर्यंत नवदुर्गा विसर्जनादरम्यान प्रतिबंधात्मक आदेश
- Get link
- X
- Other Apps
6 ते 8 ऑक्टोबरपर्यंत
नवदुर्गा विसर्जनादरम्यान प्रतिबंधात्मक आदेश
वाशिम, दि. 04 (जिमाका) : 26 सप्टेंबर रोजी नवदुर्गेची स्थापना झाली आहे. स्थापन झालेल्या नवदुर्गांचे विसर्जन 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान सार्वजनिकरित्या मिरवणूका काढून करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणूकी दरम्यान नवदुर्गा मंडळाकडून मिरवणूकीत वापरण्यात येणाऱ्या वाहनावर लोखंडी तलवार, भाले, कोयते, विळे, त्रिशुल, कटयार असे प्रत्येक वाहनांवर घातक व मारक शस्त्र लाऊन शक्ती प्रदर्शन करण्याची पार्श्वभूमि आहे. जिल्हा जातीयदृष्टया अत्यंत संवेदनशील असून सार्वजनिक सण-उत्सव काळात व इतर कारणावरुन जातीय दंगली घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा पूर्व इतिहास आहे. आगामी नवदुर्गा विसर्जनादरम्यान एखादा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था बाधीत होऊ नये याकरीता 6 ते 8 ऑक्टोबरपर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार जिल्हादंडाधिकारी, वाशिम यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment