महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना नियमीत परतफेड करणाऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ आधार क्रमांक प्रमाणीकरण करणे आवश्यक



महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

नियमीत परतफेड करणाऱ्यांना मिळणार  50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ

आधार क्रमांक प्रमाणीकरण करणे आवश्यक

            वाशिम, दि. 14 (जिमाका) :   महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना  2019 अंतर्गत अल्पमुदतीत पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली.

            सन 2017-18 या वर्षात 30 जून 2018 पर्यत, सन 2018-19 या वर्षात 30 जून 2019 पर्यत आणि सन 2019-20 या वर्षात 30 जून 2020 पर्यत या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या प्राधान्य प्रमाणे व विविध  बँकांनी  सादर केलेल्या ऑनलाईन माहिती सादर केल्याप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या विविध याद्या प्रसिध्द होणार आहे. गावानिहाय व बँकनिहाय याद्यानुसार पात्र शेतकऱ्यांना आपले आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. 13 ऑक्टोबर रोजी बँकनिहाय जिल्हयात यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्हयात यादी क्रमांक 1 नुसार 13 हजार पात्र शेतकऱ्यांच्या नावे बँक शाखानिहाय प्रसिध्द केल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक असून निर्देशित केलेल्या ठिकाणी ई-केवायसी पुर्णपणे मोफत आहे. पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरण करण्याची विविध बँक शाखा व आपले सरकार सेवा केंद्रात प्रमाणिकरण करुन घ्यावे. या योजनेच्या नजीकच्या काळात आणखी याद्या प्रसिध्द होणार आहे. याप्रमाणे सर्व पात्र शेतकऱ्यांना या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्व यादीतील शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. असे आवाहन सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय राठोड यांनी केले आहे. 

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे