पहिल्या यादीतील पात्र लाभार्थी आज प्रोत्साहनपर योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार लाभ
- Get link
- X
- Other Apps
पहिल्या यादीतील पात्र लाभार्थी
आज प्रोत्साहनपर योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार लाभ
वाशिम, दि. 19 (जिमाका) : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेतील पहिल्या यादीतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज योजनेच्या लाभाचे वितरण आज २० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हा नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. हे असतील.
पहिल्या यादीतील पात्र आधार प्रमाणीकरण यशस्वीपणे करणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक दिग्विजय राठोड यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment