रोजगार मेळाव्यातून १०४ युवक-युवतींची रोजगारासाठी विविध उद्योग व्यवसायात प्राथमिक निवड
रोजगार मेळाव्यातून १०४ युवक-युवतींची
रोजगारासाठी विविध उद्योग व्यवसायात प्राथमिक निवड
वाशिम, दि. 19 (जिमाका) महाराष्ट्र स्टार्ट अप रोजगार व उद्योजकता सप्ताहाचे १५ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले. जिल्हयातील उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व राजस्थान आर्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ऑक्टोबर रोजी राजस्थान आर्य महाविद्यालय वाशिम येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या रोजगार मेळाव्यात राज्यातील नामांकित उद्योग व्यवसायांकडून ५०० संख्येपेक्षा जास्त रिक्तपदांसाठी मनुष्यबळाची मागणी करण्यात आली .
मेळाव्यात ५२२ रोजगार इच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदविला. राज्यातील एकुण १० नामांकीत उद्योग किंवा व्यवसाय संबंधित उद्योजक/प्रतिनिधींनी उपस्थित राहून मुलाखतीद्वारे १०४ नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार देण्यासाठी प्राथमिक निवड केली.या रोजगार मेळाव्यात राजस्थान आर्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश पगारीया व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सिमा खिरोडकर,दिपक भोळसे,संजय उगले,प्रदिप नेमाडे,हिम्मत राऊत व अमोल मरेवाड व राजस्थान आर्य महाविद्यालयाचे प्रा.अनिल बन्सोड, प्रा.सुरेश मापारी व प्रा. मनोज मोरे यांनी परिश्रम घेतले.
*******
Comments
Post a Comment