११ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालिका दिन

११ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालिका दिन 

वाशिम दि.१०(जिमाका) ११ ऑक्टोबर या आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र,गाव पातळीवर ग्रामपंचायत व अंगणवाडी कार्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 
      यामध्ये स्वस्थ बालक - बालिका स्पर्धा आयोजित करून प्रमाणपत्र देणे, वादविवाद व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करणे, हात धुणे व वैयक्तिक स्वच्छतेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करणे,अंगणवाडी केंद्र, शाळा,ग्रामपंचायत, पंचायत समिती व इतर सार्वजनिक जागेवर औषधीयुक्त वनस्पतीचे वृक्षारोपण करून वाटिका तयार करणे.घरोघरी योग कुटुंबासोबत या योग दिनाच्या अनुषंगाने अंगणवाडी केंद्रावर व घरोघरी योग शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच याबाबतची जनजागृती करण्यात येणार आहे. 
      गरोदर माता व किशोरवयीन मुलींसाठी अंगणवाडी केंद्रामध्ये योग शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.ग्रामस्तरावर जन्मलेल्या मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात येणार आहे.त्यांच्या पालकांचा सत्कार व मुलींच्या नावाने वृक्षारोपण करणे, मुला इतका मुलींचा जन्मदर वाढविण्याकरीता प्रोत्साहित करण्यात येणार आहे.किशोरवयीन मुलींकरिता मासिक पाळी संदर्भात मार्गदर्शक शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. मुलीच्या उज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे.आदी कार्यक्रमाचा यामध्ये समावेश असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) संजय जोल्हे यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे