Posts

Showing posts from April, 2017

शासनाच्या योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवा - कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर

Image
·         उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान कार्यशाळेचा समारोप वाशिम , दि. १५ : शेतकऱ्यांचे उत्पन्न त्याच्या उत्पादन खर्चाच्या दुप्पट करण्यासाठी ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या कृषी विषयक सर्व योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्याचे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानाविषयक कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक एस. आर. सरदार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. डी. एम. मानकर, विस्तार संचालक डॉ. पी. जी. इंगोले आदी उपस्थित होते. ना. फुंडकर म्हणाले की, तोट्यामध्ये असलेल्या शेतीला नफ्यात आणण्यासाठी कृषी विभागाने उन्नत शेती, समृद्ध शेतकरी हे अभियान हा

शौचालय बांधकामासाठी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे श्रमदान

Image
वाशिम , दि. १५ : राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज मंगरूळपीर तालुक्यातील पेडगाव व शेलूबाजार येथे स्वतः शौचालय बांधकाम करून नागरिकांना शौचालय उभारणी करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर व आमदार राजेंद्र पाटणी, मंगरूळपीर पंचायत समितीच्या सभापती नीलिमा देशमुख, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. ना. खोत यांनी सर्वप्रथम पेडगाव येथील लीलाबाई सातपुते यांच्या घरी सुरु असलेल्या दोन शोषखड्ड्यांच्या शौचालय बांधकामाला भेट दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी या दोन शोषखड्ड्याच्या शौचालयाचे फायदे सांगितले. तसेच हे शौचालय केवळ १० हजार रुपयांमध्ये उभारणे शक्य असल्याने सर्वसामान्य नागरिकांना फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ना. खोत यांनी स्वतः श्रमदान करून शौचालय उभारणीस हातभार लावला. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, आमदार राजेंद्र पाटणी यांनीही त्यांना

‘नाफेड’च्या तूर खरेदी केंद्रांना सात दिवसांची मुदतवाढ - कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर

Image
·         राज्यात सुमारे ३३ लाख क्विंटल तूर खरेदी ·         शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील ·         शेतमालाला भाव देण्यासाठी खासगी बाजारला परवानगी वाशिम , दि. १५ : शेतकऱ्यांनी ‘नाफेड’ केंद्रांवर आणलेली शिल्लक तूर खरेदी करण्यासाठी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले. कारंजा येथे कृष्णा कृषी बाजारच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे होते. याप्रसंगी कारंजा-मानोरा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी, तुळजापूर ग्राममंडळाचे अध्यक्ष गंगाधर पाटील येवरतकर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ज्ञानेश्वर खाडे, माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, कृष्णा कृषी बाजारचे रविकुमार चांडक आदी उपस्थित होते. ना. फुंडकर म्हणाले की, राज्यातील ३०० नाफेड खरेदी केंद्रांवर आतापर्यंत सुमारे ३३ लाख क्विंटल तूर हमीभावाने खरेदी करण्यात आली आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांची तूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे. या तुरीची खरेदी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सात दिवसांची मुदतवाढ देण्याच

जिल्हाधिकारी कार्यालयातील डिजीधन मेळाव्यात ‘भीम’ अॅप विषयी मार्गदर्शन

Image
वाशिम ,  दि .  १४  :     जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या डिजीधन मेळाव्यामध्ये ‘भीम’ अॅपच्या वापराविषयी तसेच रोखरहित व्यवहाराच्या इतर पर्यायांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. रोखरहित व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने ‘भीम’ अॅपची निर्मिती केली आहे. सर्वसामान्य नागरिकालाही अतिशय सहजपणे हे अॅप वापरता येते, हे या अॅपचे वैशिष्ट्ये आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या अॅपचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात सुरु करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यावेळी केले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे अभिषेक काळे यांनी यावेळी उपस्थितांना पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनच्या सहाय्याने  ‘भीम’ अॅप व स्टेट बँकेच्या इतर अॅपविषयी माहिती दिली. यामध्ये त्यांनी ‘भीम’ अॅप कशाप्रकारे डाऊनलोड करावे, त्याचे रजिस्ट्रेशन, पैशांची देवाण-घेवाण आदी बाबींविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच या अॅपचा वापर केल्यामुळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·          सामाजिक समता सप्ताहाचा समारोप वाशिम ,  दि .  १४  :     भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय बुद्धिमान व्यक्तिमत्व होते. त्यांनी अतिशय कमी कालावधीत विविध शास्त्रांच्या पदव्या संपादन केल्या. कठीण परिस्थितीमध्येही त्यांनी जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास आजच्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे युवा वर्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यांचे विचार आत्मसात करावेत, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित या कार्यक्रमास समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार, सामाजिक कार्यकर्ते अनंतकुमार जुमडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस अर्थात १४ एप्रिल हा दिवस ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासने घेतला आहे. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी मिळावी, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीचा समान विकास होण्या

पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये उपविभागीय स्तरावर होणार ‘समाधान शिबीर’

Image
·         महाराजस्व अभियान अंतर्गत आयोजन वाशिम , दि . १३ :   सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी महाराजस्व अभियान अंतर्गत तीनही उपविभाग स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत. या समाधान शिबिराला पालकमंत्री स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या सोडविणार आहेत. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुखांच्या बैठकीत समाधान शिबिराच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी  उपस्थित होते. महाराजस्व अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या समाधान शिबिरामध्ये संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी नोडल अधिकारी म्ह

पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांना जिल्हास्तरीय समितीची मंजुरी

Image
वाशिम , दि . १३ :   बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या बैठकीत तत्वतः मंजुरी दिली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात करण्यात येणाऱ्या सुमारे २५ कोटी रुपयांच्या कामांच्या आराखड्याला आज पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली. याप्रसंगी खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे २५ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये भक्त निवासाचे बांधकाम, संरक्षण भिंतीचे बांधकाम, प्रदर्शन केंद्राचे बांधकाम, अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम, खुल्या सभागृहाचे बांधकाम, जागेचे सपाटीकरण व गार्डनिंग आदी

आरोग्य विभागाच्या चित्ररथचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उदघाटन

Image
वाशिम , दि . १३ :   उष्माघातापासून बचावासाठी जनजागृती करण्याकरिता वाशिम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तयार केलेल्या चित्ररथाचे उदघाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज करण्यात आले. उष्माघातापासून नागरिकांचे संरक्षण होण्यासाठी आरोग्य विभागाने तयार केलेल्या चित्ररथाचे पालकमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले. याप्रसंगी खासदार भावना गवळी, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. पटेल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. मेहकरकर आदी उपस्थित होते. आरोग्य विभागाने तयार केलेल्या चित्ररथाद्वारे उष्माघाताची कारणे, उष्माघात होण्याची लक्षणे, उष्माघातावर प्रतिबंधक उपाय व उष्माघातावर उपचार याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच चित्ररथासोबत उष्माघातापासून बचावासाठी काय करावे, काय करू नये याविषयीची माहिती देणाऱ्या पत्रकाचे वाटपही करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकर यांनी यावेळी सा

सोयाबीन ऐवजी पर्यायी पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा - पालकमंत्री संजय राठोड

Image
·         खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठक ·         पुरेसे खत, बियाणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना ·         प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्जाचा लाभ मिळावा ·         बोगस बियाणे, खत विक्रेत्यांवर कारवाईसाठी पथके तयार करा वाशिम , दि . १३ :   खरीप हंगामात सोयाबीन पेरणीवर सर्वाधिक शेतकऱ्यांचा भर असतो. त्यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सोयाबीनच्या दरात यंदा मोठी घसरण झाली आहे. याचा फटका शेतकरी बांधवांना बसला आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामात सोयाबीनला चांगला पर्याय ठरू शकेल, अशा पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याच्या सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी कृषी विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आज आयोजित खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी

पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये आज खरीप हंगाम पूर्व तयारी बैठक

·        जिल्हास्तरीय विभाग प्रमुखांचीही बैठक वाशिम , दि . १२ :   महसूल राज्यमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड हे गुरुवार, दि. १३ एप्रिल २०१७ रोजी वाशिम दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये खरीप हंगामासाठी प्रशासनाने केलेल्या पूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात सकाळी ११ वाजता होणाऱ्या या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री ना. राठोड हे दि. १३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता शासकीय वाहनाने दारव्हा, कारंजा मार्गे वाशिमकडे प्रयाण करतील. सकाळी १०.३० वाजता त्यांचे वाशिम येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. सकाळी ११ वाजता त्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठक होईल. यानंतर दुपारी १ वाजता जिल्हास्तरीय विभाग प्रमुखांचीही बैठकही पालकमंत्री ना. राठोड यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. यामध्ये गावठाण जमिनी, सन २०१३ मध्ये महापुरामुळे खरडून गेलेल्या जमिनींचे पंचनामे आदी विषयांच्या अनु

सिंचनाच्या विविध उपाययोजनांमुळे राज्यातील कृषी विकास दर १२ टक्के - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
·         शेतकऱ्यांच्या उत्पन्नात यावर्षी ४० हजार कोटींची वाढ ·         कारंजा, मानोरा तालुक्यासाठी ३ हजार विहिरींचा प्रस्ताव पाठवा ·         पोहरादेवी विकास आराखड्यासाठी निधी कमी पडू देणार नाही ·        पोहरादेवी विकास आराखड्यातून बंजारा समाजाचे दर्शन घडणार वाशिम , दि. २ : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात राबविलेले जलयुक्त शिवार अभियान व सिंचन विहिरीसारख्या उपाययोजनांमुळे शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून उणे असलेला कृषी विकासदर यंदा १२ टक्के झाला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी (जि. वाशिम) येथे आयोजित विश्वशांती लक्षचंडी महायज्ञाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री आज पोहरादेवी येथे आले होते. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार मनोहर नाईक, आमदार हरिभाऊ राठोड, पोहरादेवी संस्थानचे प्रमुख रामराव महाराज, माजी आमदार अनंतराव पाटील, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस विशेष