पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांना जिल्हास्तरीय समितीची मंजुरी


वाशिम, दि. १३ :  बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या बैठकीत तत्वतः मंजुरी दिली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात करण्यात येणाऱ्या सुमारे २५ कोटी रुपयांच्या कामांच्या आराखड्याला आज पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली.
याप्रसंगी खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे २५ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये भक्त निवासाचे बांधकाम, संरक्षण भिंतीचे बांधकाम, प्रदर्शन केंद्राचे बांधकाम, अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम, खुल्या सभागृहाचे बांधकाम, जागेचे सपाटीकरण व गार्डनिंग आदी कामांचा समावेश आहे. 

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर