Posts

Showing posts from July, 2020

१५ जुलैपासून मंगरूळपीर, रिसोडमध्ये संपूर्ण लॉकडाऊन; तर इतर चार शहरांमध्ये ८ ते २ वाजेपर्यंतच दुकाने सुरु राहणार

Image
वाशिम , दि. १३ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी मंगरूळपीर रिसोड या शहरांमध्ये तसेच लगतच्या काही गावांमध्ये १५ जुलैपासून सात दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत सर्व दुकाने , आस्थापना , खासगी कार्यालये , पेट्रोलपंप , बँक बंद राहणार आहेत. सकाळी ७ ते १० वा. पर्यंत केवळ दुध व भाजीपाला विक्री सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. वाशिम , मालेगाव , कारंजा लाड आणि मानोरा या शहरांमध्ये सुद्धा लॉकडाऊनची सुधारित नियमावली लागू येणार आहे. या चारही शहरांमधील यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने , आस्थापना सुरु ठेवण्याचा कालावधी १५ जुलैपासून सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर सर्व आस्थापना , दुकाने व सार्वजनिक ठिकाणी लोकांनी सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करणे , मास्क , सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले. मात्र , या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले असून त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मंग

#कोरोना अपडेट्स

Image

हेल्पलाईनवर स्वतःहून माहिती दिलेल्या ४ जणांना कोरोना संसर्गाचे निदान

Image
·          लवकर निदान होवून उपचार सुरु झाल्याने प्रकृती स्थिर ·          लक्षणे असलेल्या इतर नागरिकांनीही संपर्क साधण्याचे आवाहन ·          लवकर   निदान झाल्यास कोरोना बरा होण्याची शक्यता अधिक वाशिम , दि. १२ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गाचे लवकर निदान होवून उपचार सुरु झाल्यास रुग्ण बरे होण्याची शक्यता अधिक आहे. याउलट परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्यास डॉक्टरांना उपचारासाठी पुरेसा कालावधी मिळत नसल्याने अशा बाधित व्यक्तींचा मृत्यूही होवू शकतो. त्यामुळे कोरोना संसर्गाची लक्षणे दिसताच स्वतःहून पुढे येवून माहिती देण्याचे, आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले होते. त्यानुसार आतापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाईनवर स्वतःहून माहिती दिलेल्या चार व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. सदर चारही व्यक्तींवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. लवकर निदान होवून उपचार सुरु झाल्याने या चारही व्यक्तींची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये ताप, सर्दी, कोरडा

मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते ‘तेजश्री’ योजनेच्या धनादेशांचे वितरण

Image
·         ‘ई-शक्ती’ वेब पोर्टलचे अनावरण वाशिम , दि. ०८ (जिमाका) : मानव विकास कार्यक्रमामध्ये समाविष्ट वाशिम, मालेगाव, रिसोड व मानोरा या चार तालुक्यात महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या ०७ लोकसंचालीत साधन केंद्रांना तेजश्री फायनान्सशियल सर्व्हिसेस अंतर्गत एकूण १ कोटी ३ लक्ष ९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीच्या धनादेशाचे वितरण महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, समाज कल्याण सभापती वनिता देवरे, महिला व बालकल्याण सभापती शोभा गावंडे, बांधकाम सभापती विजय खानझोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड, ‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, ‘नाबार्ड’चे जिल्हा व्यवस्थापक विजय खंडरे, ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बचत गटाचे सदस्य

प्रत्येक जिल्ह्यात महिला व बाल विकास भवन उभारणार - ॲड. यशोमती ठाकूर

Image
·         महिला व बाल विकास विभागाच्या योजनांचा आढावा ·         पोषण आहार नियमितपणे घरपोच वाटप करा वाशिम , दि. ०८ (जिमाका) : महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत असलेली सर्व जिल्हास्तरीय कार्यालये एकाच छताखाली आणून महिला व बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला व बाल विकास भवन उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले. पथदर्शी प्रकल्प म्हणून वाशिम जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेतून हे भवन उभारण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद सभागृहात महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या आढावा बैठकीत आज, ८ जुलै रोजी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, समाज कल्याण सभापती वनिता देवरे, महिला व बालकल्याण सभापती शोभा गावंडे, बांधकाम सभापती विजय खानझोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठो

‘रुरल मार्ट’ प्रत्येक जिल्ह्यात असावे - ॲड. यशोमती ठाकूर

Image
·         कारंजा येथील रुरल मार्टला भेट वाशिम , दि. ०८ (जिमाका) : बचतगटांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील महिला संघटीत झाल्या आहेत. आता त्या उद्योग-व्यवसाय करीत आहे. त्यांनी उत्पादित केलेले खाद्यपदार्थ आणि वस्तू ह्या रुरल मार्टच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाची जास्तीत जास्त विक्री व्हावी आणि महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात, यासाठी असे रुरल मार्ट प्रत्येक जिल्ह्यात असावेत, असे मत महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. आज ८ जुलै रोजी कारंजा येथे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड पुरस्कृत महिला आर्थिक विकास महामंडळ , वाशिम द्वारा संचालित महिला बचतगटांच्या उत्पादित वस्तूंचे विक्री केंद्र असलेल्या ‘रुरल मार्ट’ला ॲड. श्रीमती ठाकूर यांनी भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे , जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) नितीन मोहुर्ले , महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे , कारंजा उ

कोरोना संसर्गाची लक्षणे असल्यास हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्या

Image
·           नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन कार्यान्वित वाशिम ,  दि. ०६ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्ग लक्षणे असणाऱ्या व्यक्तींला योग्य मदत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे. तरी जिभेची चव जाणे ,  कोरडा खोकला ,  ताप ,  श्वास घेण्यास त्रास होणे ,  घसा दुखणे अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींबाबत ८३७९९२९४१५ या हेल्पलाईन क्रमांकावर व्हाटसअप  संदेशाद्वारे माहिती द्यावी ,  असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे. कोरोना संसर्ग झाल्याचे लवकरात लवकर निदान होवून त्यावर बाधित व्यक्तीला योग्य उपचार मिळाल्यास तो व्यक्ती बरा होतो. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरीय हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली असून कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची माहिती याद्वारे संकलित केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीची आरोग्य तपासणी करून पुढील आवश्यक कार्यवाही केली जाईल. त्यामुळे जिभेची चव जाणे ,  कोरडा खोकला ,  ताप ,  श्वास घेण्यास त्रास होणे ,  घसा द