कोरोना संसर्गाची लक्षणे असल्यास हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्या


·         नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन कार्यान्वित
वाशिमदि. ०६ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्ग लक्षणे असणाऱ्या व्यक्तींला योग्य मदत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे. तरी जिभेची चव जाणेकोरडा खोकलातापश्वास घेण्यास त्रास होणेघसा दुखणे अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींबाबत ८३७९९२९४१५ या हेल्पलाईन क्रमांकावर व्हाटसअप  संदेशाद्वारे माहिती द्यावीअसे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.
कोरोना संसर्ग झाल्याचे लवकरात लवकर निदान होवून त्यावर बाधित व्यक्तीला योग्य उपचार मिळाल्यास तो व्यक्ती बरा होतो. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरीय हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली असून कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची माहिती याद्वारे संकलित केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीची आरोग्य तपासणी करून पुढील आवश्यक कार्यवाही केली जाईल. त्यामुळे जिभेची चव जाणेकोरडा खोकलातापश्वास घेण्यास त्रास होणेघसा दुखणे अशी लक्षणे असणाऱ्या आपल्या कुटुंबातीलपरिसरातील व्यक्तींचे नावसंपूर्ण पत्तासंपर्क क्रमांक आदी  माहिती ८३७९९२९४१५ या व्हाटसअप क्रमांकावर पाठवून सहकार्य करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी केले आहे.
डिस्चार्ज दिलेल्या व्यक्तींच्या आरोग्यविषयक स्थितीचा पाठपुरावा
कोरोना विषयक चाचणीमध्ये निगेटिव्ह अहवाल आल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज दिलेल्या कोरोना बाधितांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तीतसेच पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेल्या व्यक्तींच्या आरोग्यविषयक स्थितीचा पाठपुरावा जिल्हास्तरीय मदत कक्षाद्वारे घेतला जात. रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्यानंतर पुढील १४ दिवस ठराविक कालावधीत या व्यक्तींना फोनद्वारे संपर्क साधून त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीची माहिती घेतली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश