Posts

Showing posts from August, 2018

१ सप्टेंबरपासून नवीन मतदार नोंदणी मोहीम

·          राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक वाशिम , दि. ३० : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार दि. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी शनिवार, दि. १ सप्टेंबर २०१८ रोजी प्रसिद्धी होणार आहे. यानंतर दि. १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोंबर २०१८ या कालावधीत नवीन मतदार नोंदणी करता येणार असून सर्वच राजकीय पक्षांनी या मोहिमेत सहभागी होऊन नवीन मतदार नोंदणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन उपजिल्हा निवणूक अधिकारी राजेश हांडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या विविध राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. दि. १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या करणाऱ्या व्यक्तींना या मोहिमेदरम्यान मतदार म्हणून नोव नोंदणी करता येणार आहे. याचबरोबर मतदार यादीतील दुरुस्ती, सुधारणाही करता येणार आहे. मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नवे वगळण्यात आली आहे. त्याची यादीही पाहता येणार आहे. दि. १ सप्टेंबरपासून ऑनलाईन मतदार नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे १८ वर्षे पूर्ण केलेल्या ज्या व्यक्तींनी अद्याप मतदार यादीत नाव नोंदविले ना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. एस. आर. रंगनाथन पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

·          विहित नमुन्यातील अर्ज दि. २८ सप्टेंबरपर्यंत स्वीकारले जाणार वाशिम , दि. ३० : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या ग्रंथालय संचालनालयामार्फत सन २०१८-१९ मध्ये देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार व डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कारासाठी दि. २८ सप्टेंबर २०१८ पर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे अर्ज तीन प्रतीत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा , त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतो. राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ , ब , क आणि ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान

जिल्हास्तरीय शालेय १७ वर्षे मुले-मुली कबड्डी, हॅण्डबॉल स्पर्धेच्या तारखेत बदल

वाशिम , दि. ३० : क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्षे वयोगटातील मुले-मुली यांच्या कबड्डी व हॅण्डबॉल स्पर्धांच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार १७ वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा दि. ८ सप्टेंबर २०१८ रोजी मंगरूळपीर तालुक्यातील कुंभी येथील डॉ. एल. बी. शेळके विद्यालयात होतील. तसेच जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील हॅण्डबॉल स्पर्धा दि. १८ व १९ सप्टेंबर २०१८ रोजी कारंजा तालुका क्रीडा संकुल येथे होतील. हा बदल लक्षात घेऊन प्रवेश नोंदविलेल्या सर्व संघांनी स्पर्धेच्या दिवशी सकाळी १० वाजता स्पर्धास्थळी उपस्थित रहावे. अधिक माहितीकरिता स्पर्धा संयोजक किशोर बोंडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये यांनी केले आहे.

जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

·          पंचायत समिती, जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयात अर्जाचा नमुना उपलब्ध वाशिम , दि. ३० : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत सन २०१८-१९ करिता २० टक्के जिल्हा परिषद सेस अंतर्गत मागासवर्गीय वस्तीत दिवाबात्तीची (एल.ई.डी. लाईटची) सोय करणे (सामुहिक लाभाची योजना) व मागासवर्गीय शेतकऱ्यांना डीझेल इंजिन पुरविणे (वैयक्तिक लाभाची योजना) ह्या योजना १०० टक्के अनुदानावर डी. बी. टी. तत्वावर राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी सादर करावयाच्या अर्जाचे नमुने तसेच माहिती संबंधित पंचायत समिती कार्यालय व जिल्हा परिषदेतील जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध आहे. तरी इच्छुक ग्रामपंचायत तसेच लाभार्थ्यांनी आपले परिपूर्ण अर्ज व आवश्यक कागदपत्रे दि. १० सप्टेंबर २०१८ पर्यंत संबंधित पंचायत समिती कार्यालयात जमा करावीत, असे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समिती सभापती पानुताई जाधव व जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस. एन. खमितकर यांनी कळविले आहे.

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी भूजल व्यवस्थापन आवश्यक - हर्षदा देशमुख

Image
·        भूजल अधिनियम मसुदा विषयक कार्यशाळा ·        नागरिकांनी हरकती, सूचना पाठविण्याचे आवाहन वाशिम ,   दि .   २८   :   भविष्यात आपल्या भावी पिढीला पुरेसा व शुद्ध भूजलसाठा उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच भूजल व्यवस्थापन व पुनर्भरण करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी व्यक्त केले. जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियमाच्या मसुद्याची माहिती देण्यासाठी आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी वरिष्ठ भूजल वैज्ञानिक एस. एस. कडू, भूजल सर्वेक्षण विभागाचे उप अभियंता विवेक कुंडे, आर. ए. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आर. जी. मस्के, प्रा. डॉ. अनिल बनसोड यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषद अध्यक्ष देशमुख पुढे म्हणाल्या, भूजलाचा अतिवापर थांबविणे तसेच जलयुक्त शिवार अभियान तसेच लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करून भूजल पुनर्भरण करणे, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. भूजलाचा वापर नियंत्रित करणे सुध्दा आवश्यक आहे. भूजल नियमनासाठी राज्य शासनाने तयार केलेला महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम तयार केला असून त्याचा मस

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी - पालकमंत्री संजय राठोड

Image
·         वाशिम येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण ·         ग्रामीण आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी ‘ हेल्थ अँड वेलनेस सेंटर’ सुरु होणार ·         जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्मिती करण्यावर विशेष भर वाशिम , दि . १५ :     जिल्ह्यातील शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे, यासाठी जलयुक्त शिवार अभियान, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना यासह अन्य कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहणानंतर ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे, नगराध्यक्ष अशोक हेडा यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक कर्जमाफी करून शेतकऱ्यां

‘युवा माहिती दूत’मुळे प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल - पालकमंत्री संजय राठोड

Image
·         वाशिम जिल्ह्यात ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा शुभारंभ ·         ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाच्या बोधचिन्हाचे अनावरण वाशिम , दि . १५ :   युनिसेफच्या सहयोगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून सुरु होत असलेल्या ‘युवा माहिती दूत’ उपक्रमामुळे शासनाच्या कल्याणकारी योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे, नगराध्यक्ष अशोक हेडा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, ‘युवा माहिती दूत’ उपक्रमामुळ

बोंडअळीच्या नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करा - पालकमंत्री संजय राठोड

Image
• जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक • जिल्ह्यातील कोल्हापूर पध्दतीचे सर्व बंधारे दुरुस्त करण्याच्या सूचना • शासकीय रुग्णालयांमधील सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश • जिल्ह्यातील सर्व व्यायामशाळांची होणार तपासणी वाशिम, दि. १४ : गतवर्षी कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यावर्षी सुध्दा बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे बोंडअळीवर नियंत्रण आणण्यासाठी कृषि विभागाने तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी आज दिल्या. नियोजन भवन सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, कापसावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी करावयाच्

थकबाकीदार शेतकऱ्यांनी पिक कर्ज पुनर्गठण योजनेचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

Image
·         पुनर्गठण केल्यानंतर लगेच मिळणार नवीन पिक कर्ज ·         पुनर्गठण, पिक कर्ज वाटपाची प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना वाशिम ,   दि .   ०३   :   शेतकऱ्यांनी सन २०१७-१८ मध्ये घेतलेल्या व अद्याप भरणा ने केलेल्या पिक कर्जाचे पुनर्गठण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार कर्जाचे पुनर्गठण करणाऱ्या शेतकऱ्यांना लगेच नवीन पिक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पिक कर्ज पुनर्गठण करण्यासाठी आवश्यक संमतीपत्र तातडीने संबंधित बँक शाखेत अथवा सेवा संस्थेच्या सचिवाकडे जमा करून पिक कर्ज पुनर्गठण योजना व नवीन पिक कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे. नियोजन भवन येथे आज झालेल्या सर्व बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले, सन २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेले २४ हजार ४४७ शेतकऱ्यांचे सुमारे २१२ कोटी रुपये पिक कर्ज शासन निर्णयानुसार पुनर्गठणासाठी पात्र आहे. त्यामुळे या सर्व श

शंकरच्या पिढीजात व्यवसायाला मुद्राचा आधार

Image
शंकर खोडके... व्यवसाय केस कर्तन. पिढीजात व्यवसाय करणारे आज आपल्या व्यवसायापासून दूर जात असताना शंकरने आपला हा व्यवसाय ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता सुरूच ठेवला तो वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर या आपल्या गावापासून ४ किलोमीटर अंतर असलेल्या तांदळी या गावात. कधी पायीपायी तर कधी सायकलने दररोज व्यवसायासाठी तांदळी गाठावी लागायची. घरी ३ मुले मोठे होत असताना त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न शंकरला पडायचा. कुठे तरी आपण स्थिर होवून हा व्यवसाय केला पाहिजे असा विचार डोक्यात येत असायचा. एकदा शंकर गावातील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत गेला असता प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेची माहिती बँकेचे व्यवस्थापक श्री. अर्जुन राऊत यांनी दिली. प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना ही गरजू आणि बेरोजगार व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी असल्यामुळे आता या योजनेतून आपण कर्ज घेवून पार्डी टकमोर या आपल्या गावातच आपला पिढीजात केस कर्तनाचा व्यवसाय सुरु करून व्यवसायासाठी तांदळीत होणारी पायपीट थांबविण्याचा निर्णय शंकरने घेतला. वडिलोपार्जित हा व्यवसाय असल्यामुळे वडिलांना २५ वर्षांपासून शंकर या व्यवसायात मदत करायचा. लग्न

वाशिम येथे होणार केंद्रीय विद्यालय

Image
महाराष्ट्रातील 2 विद्यालयांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी नवी दिल्ली, 1 :  महाराष्ट्रातील वाशीम आणि परभणी जिल्ह्यात दोन नवीन केंद्रीय विद्यालयांना केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक झाली असून महाराष्ट्रातील 2 केंद्रीय विद्यालयांसह सहा राज्यात एकूण 13 केंद्रीय विद्यालयांना आज मंजूरी मिळाली. महाराष्ट्रातील होऊ घातलेले केंद्रीय विद्यालय विदर्भातील वाशीम आणि मराठवाडयातील परभणी जिल्ह्यात  असणार आहे. यासह मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालयास मंजूरी मिळाली आहे. देशभरातील 12 लाख विद्यार्थी केंद्रीय विद्यालयातून शिक्षण घेत आहेत.  13 नवीन शाळांमुळे13 हजार  पेक्षा अधिक विद्यार्थांना याचा लाभ होणार आहे. मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने  मार्च-2017 मध्ये  ‘आव्हान प्रणाली’च्या अंर्तगत अंदाजित 1160 कोटी रूपये मंजूर केले आहेत. याअंतर्गत 50 नवीन केंद्रीय विद्यालयांना स्थापन करण्याची मंजूरी दिली होती. हे विद्यालय त्याच ठिकाणी उघडण्यात येतील जेथे प्रायोजक संस्था केंद्रीय विद्या

समाज माध्यमांतील माहितीची सत्यता पडताळणे आवश्यक - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

Image
·         ‘फेक न्यूज : परिणाम व दक्षता’ विषयावर मार्गदर्शन वाशिम , दि . ०१ : समाज माध्यमांचा वापर आज मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या माध्यमांतून देण्यात येणाऱ्या माहितीचा प्रसार गतीने होऊन त्यावर तत्काळ प्रतिक्रिया उमटतात. अनेकदा चुकीची माहिती पुढे पाठविल्यामुळे विपरीत घटना घडून सामाजिक वातावरण बिघडू शकते. त्यामुळे समाज माध्यमांचा वापर करतांना प्रत्येकाने या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या माहितीची पडताळणी करूनच ती माहिती पुढे पाठविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी १ ऑगस्ट रोजी नवीन पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक सपना गोरे, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले, समाज माध्यम ह