जिल्हास्तरीय शालेय १७ वर्षे मुले-मुली कबड्डी, हॅण्डबॉल स्पर्धेच्या तारखेत बदल
वाशिम,
दि. ३० : क्रीडा व युवक सेवा संचालनालय
व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्षे
वयोगटातील मुले-मुली यांच्या कबड्डी व हॅण्डबॉल स्पर्धांच्या तारखेत बदल करण्यात
आला आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार १७ वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय शालेय
कबड्डी स्पर्धा दि. ८ सप्टेंबर २०१८ रोजी मंगरूळपीर तालुक्यातील कुंभी येथील डॉ.
एल. बी. शेळके विद्यालयात होतील. तसेच जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या १४, १७
व १९ वर्षे वयोगटातील हॅण्डबॉल स्पर्धा दि. १८ व १९ सप्टेंबर २०१८ रोजी कारंजा
तालुका क्रीडा संकुल येथे होतील. हा बदल लक्षात घेऊन प्रवेश नोंदविलेल्या सर्व
संघांनी स्पर्धेच्या दिवशी सकाळी १० वाजता स्पर्धास्थळी उपस्थित रहावे. अधिक
माहितीकरिता स्पर्धा संयोजक किशोर बोंडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा
क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये यांनी केले आहे.
Comments
Post a Comment