डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. एस. आर. रंगनाथन पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन


·         विहित नमुन्यातील अर्ज दि. २८ सप्टेंबरपर्यंत स्वीकारले जाणार
वाशिम, दि. ३० : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या ग्रंथालय संचालनालयामार्फत सन २०१८-१९ मध्ये देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार व डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कारासाठी दि. २८ सप्टेंबर २०१८ पर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे अर्ज तीन प्रतीत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतो.
राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, , क आणि ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे ५० हजार रुपये, ३० हजार रुपये, २० हजार रुपये, १० हजार रुपये रोख रक्कम, शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. राज्यस्तरीय प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी २५ हजार रोख रक्कम, शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र तसेच राज्यातील प्रत्येकी महसुली विभग स्तरावर प्रत्येकी एक कार्यकर्ता व सेवक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी १५ हजार रोख रक्कम, शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. सन २०१८-१९ च्या पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रंथालय, कार्यकर्ता व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील . अर्ज दि. २८ सप्टेंबर २०१८ पर्यत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन प्रभारी ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी प्रसिध्दीपत्रकादवारे केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे