१ सप्टेंबरपासून नवीन मतदार नोंदणी मोहीम


·         राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक
वाशिम, दि. ३० : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार दि. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी शनिवार, दि. १ सप्टेंबर २०१८ रोजी प्रसिद्धी होणार आहे. यानंतर दि. १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोंबर २०१८ या कालावधीत नवीन मतदार नोंदणी करता येणार असून सर्वच राजकीय पक्षांनी या मोहिमेत सहभागी होऊन नवीन मतदार नोंदणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन उपजिल्हा निवणूक अधिकारी राजेश हांडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या विविध राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते.
दि. १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या करणाऱ्या व्यक्तींना या मोहिमेदरम्यान मतदार म्हणून नोव नोंदणी करता येणार आहे. याचबरोबर मतदार यादीतील दुरुस्ती, सुधारणाही करता येणार आहे. मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नवे वगळण्यात आली आहे. त्याची यादीही पाहता येणार आहे. दि. १ सप्टेंबरपासून ऑनलाईन मतदार नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे १८ वर्षे पूर्ण केलेल्या ज्या व्यक्तींनी अद्याप मतदार यादीत नाव नोंदविले नाही, त्यांनी या मोहिमेदरम्यान मतदार नोंदणी करावी, असे आवाहन श्री. हांडे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे