Posts

Showing posts from August, 2022

अग्निवीर निवड प्रक्रिया मानकापूर क्रीडा संकुलात पार पाडणार जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी घेतला सैन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा

Image
अग्निवीर निवड प्रक्रिया मानकापूर क्रीडा संकुलात पार पाडणार जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी घेतला सैन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा नागपूर दि. ३१ : भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच नोंदणी झालेल्या पुरुष उमेदवारांसाठी १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा निहाय निवड प्रक्रिया आता मानकापूर क्रीडा संकुल येथे पार पडणार असल्याची माहिती नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आज येथे दिली.       'अग्निवीर ' अर्थात सैन्य भरती नोंदणी करण्यासाठी दिलेल्या कालावधीमध्ये विदर्भातील दहा जिल्ह्यांमधून ५९ हजार ९११ उमेदवारांची नोंदणी झाली आहे. नोंदणी झालेल्या उमेदवारांचीच निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.      त्यासाठी आवश्यक असणाऱ्या शारीरिक स्पर्धा व अन्य बाबींसाठी नागपूर शहरातील मानकापूर क्रीडा संकुल हे योग्य स्थळ असून याच ठिकाणी ही प्रक्रिया पार पडली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा व अन्य व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना आज त्यांनी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान

ध्वनी प्रदुषणाबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी नियुक्त

Image
ध्वनी प्रदुषणाबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी नियुक्त जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती गठीत           वाशिम, दि.  30  (जिमाका) :  श्री गणेशोत्सव 2022 च्या अनुषंगाने जिल्हयातील ध्वनी प्रदुषण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ध्वनी प्रदुषणाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच ध्वनी प्रदुषणाचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हयातील ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नावे, भ्रमणध्वनी क्रमांक, दूरध्वनी क्रमांक व नियंत्रण कक्ष, वाशिम येथील व्हॉट्सॲप क्रमांक व ई-मेल आयडीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.          जिल्हयातील ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकारी पुढीलप्रमाणे आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम सुनिलकुमार पुजारी, (7385300444), दूरध्वनी क्रमांक 07252-232545, वाशिम शहर पोलीस स्टेशन- पोलीस निरीक्षक रफिक शेख (9922799027), दूरध्वनी क्रमांक 07252-232100, वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन- सहायक पोलीस निरीक्षक श्री. झळके (9921516866), दूरध्वनी क्रमांक 07252

जिल्हाधिकाऱ्यांची काटा येथील मतदान बुथ व सीएससी केंद्राला भेट

Image
जिल्हाधिकाऱ्यांची काटा येथील मतदान बुथ व सीएससी केंद्राला भेट          वाशिम, दि. 30 (जिमाका) : जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 30 ऑगस्ट रोजी वाशिम तालुक्यातील काटा या गावी भेट देऊन मतदार ओळखपत्राचे आधार क्रमांकाशी जोडणी करण्यात येत असलेल्या प्राथमिक शाळेतील मतदान बुथला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, तहसिलदार विजय साळवे व महाआयटीचे जिल्हा समन्वयक सौरभ जैन यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.          काटा येथील मतदान बुथवर उपस्थित असलेले मतदार केंद्रस्तरीय अधिकारी सुनिता वाघ, गजानन गायकवाड आणि किशोर धामणे यांचेकडून 1 ऑगस्टपासून आतापर्यंत किती मतदार ओळखपत्रांचे आधार क्रमाकांशी जोडणी करण्यात आली याबाबतची माहिती श्री. षण्मुगराजन यांनी जाणून घेतली. 10 सप्टेंबरपर्यंत गावातील सर्व मतदारांचे मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी जोडण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या. आधार लिंकींगचे काम मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी कमी प्रमाणात केल्याबद्दल नाराजी व्यक्त करुन जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थीतीत येत्या 10 सप्टेंबरपर्यंत ग

जिल्हयात व्यापक मोहिम राबवून कुष्ठरुग्ण व सक्रीय क्षयरुग्णांचा शोध घ्यावा षण्मुगराजन एस.

Image
जिल्हयात व्यापक मोहिम राबवून कुष्ठरुग्ण व सक्रीय क्षयरुग्णांचा शोध घ्यावा                                                  षण्मुगराजन एस. जिल्हा समन्वय समिती सभा १३ ते ३० सप्टेंबरपर्यंत कृष्ठरुग्ण व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम           वाशिम, दि.  30  (जिमाका) :  जिल्हयात अद्यापही निदान न झालेल्या कृष्ठरुग्णांचा व सक्रीय क्षयरुग्णांचा व्यापक मोहिम राबवून शोध घ्यावा. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.           कृष्ठरुग्ण शोध मोहिम व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम 2022-23 च्या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीची सभा 29 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरुन श्री. षण्मुगराजन बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. संजय देशपांडे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मिलींद जाधव, जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार डॉ. सुवर्णा रामटेके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री. ससे व सर्व तालुका अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती हो

प्रसाद व अन्नदानासाठी अधिनियमातील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक सार्वजनिक गणेश मंडळांना अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

Image
प्रसाद व अन्नदानासाठी अधिनियमातील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक सार्वजनिक गणेश मंडळांना अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन          वाशिम, दि. 30 (जिमाका) : ३१ ऑगस्टपासुन गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेश उत्सवानिमित्त विविध मंडळामार्फत भंडारा प्रसाद, अन्नदान इत्यादी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हयातील सर्व सार्वजनिक धार्मिक उत्सव मंडळे, त्यांचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन व वितरण करणारे अन्न व्यावसायीक यांनी अन्न, सुरक्षा व मानके अधिनियमानुसार तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे. असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.          प्रसाद वितरण करणाऱ्या मंडळांनी अन्न सुरक्षा कायद्यानुसार www.foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करुन प्रतिवर्ष १०० रुपये शुल्क भरावे व नोंदणी प्रमाणपत्र घेण्यात यावे. प्रसाद तयार करतांना उत्पादनाची जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी. प्रसादासाठी लागणारा कच्चा माल अन्नपदार्थ परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायीकांकडून खरेदी करावा. प्रसाद बनविणाऱ्या केटरर्सची माहिती अद्यावत करुन ठेवावी. प्रसा

महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेस जिल्हयात उत्स्फुर्त प्रतिसाद

Image
महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेस जिल्हयात उत्स्फुर्त प्रतिसाद नवसंकल्पनांसाठी ऑनलाईन नोंदणी करावी कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्तांचे आवाहन           वाशिम, दि.  30  (जिमाका) :  राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते १५ ऑगष्ट २०२२ रोजी करण्यात आला. महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा २५ ऑगष्टपासून जिल्हयातील विविध तालुकास्तरावर दाखल झाली आहे. या यात्रेचा चित्ररथ २ सप्टेंबर रोजी रिसोड तालुकास्तरावर व ३ सप्टेंबर रोजी वाशिम व मालेगांव या तालुकास्तरावर दाखल होणार आहे. जिल्हयातील नवउद्योजकांना जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धेत सहभागी होण्याकरीता  www.msins.in  किंवा  www. mahastartupyatra.in  या संकेतस्थळावर त्यांच्या नावांची नोंदणी करणे आवश्यक आहे.         नोंदणी करतांना नवउद्योजकांना प्रामुख्याने स्वतःचे नांव, पत्ता, संपर्क क्रमांक व सादरीकरण करण्यात येणाऱ्या संकल्पाना याविषयी किमान ३०० शब्दात माहिती दयाव

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे क्रीडा दिन उत्साहात साजरा

Image
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे क्रीडा दिन उत्साहात साजरा खेळाडूंचा सत्कार, खेळांचे प्रात्याक्षीके व रॅलीचे आयोजन           वाशिम, दि.  30  (जिमाका) :  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परीषद व जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, वाशिम यांच्या संयुक्त वतीने स्व. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्हा क्रीडा संकुल येथे विविध खेळाचे आयोजन, प्रात्यक्षिक, वृक्षारोपण व रॅलीचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कारसुध्दा करण्यात आला. कबड्डीच्या प्रदर्शनीय सामन्यात जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र वाशिमचा संघ विजयी झाला. नॅशनल युथ क्लब वाशिमचा संघ उपविजेता ठरला. तिरंदाजी या खेळाच्या स्पर्धा व कराटे या खेळाचे प्रात्याक्षिकसुध्दा यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आले. राष्ट्रीय खेळाडू गजानन कुऱ्हे, वैभव उगले, रघु घाटोळ, शेख अब्दुल, ललीत जाधव, लखन चव्हाण, (कबडडी) भाग्यश्री बल्लाळ, शितल सावलकर, गुंजण चव्हाण, करण इंगोले (तिरंदाजी) क्षितीज राउत, वृषभ ढवळे, मृणाली आकरे (रायफल शुटिंग) प्रसन्न देशमुख (क

फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान

Image
फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान           वाशिम, दि.  30  (जिमाका) :  जिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजी गणेश स्थापना होणार आहे. 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबरपर्यंत गणेश मुर्तीचे विसर्जन होणार आहे. या सण उत्सवाच्या काळात जिल्ह्यात शातंता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना 31 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2022 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये अधिकार प्रदान केले आहे.         रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणूकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांनी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे. कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका कोणत्या मार्गांनी व कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नये, असे मार्ग व अशा वेळा निश्चित करणे. सर्व मिरवणुकींच्या व जमावाच्या प्रसंगी व उपासनेच्या जागांच्या आसपास उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यावरून किंवा सार्वजनिक जागा किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होत असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवू न देणे. सर्व रस्त्यांवर

लम्पी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुधनाची काळजी घ्या

Image
लम्पी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुधनाची काळजी घ्या पशुसंवर्धन विभागाचे आवाहन           वाशिम, दि.  30  (जिमाका) :  राज्यात सध्या अहमदनगर, जळगाव, धुळे व अकोला या जिल्हयात पाळीव जनावरांना लम्पी स्किन डिसीस रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हयात सध्या या रोगाचा प्रादुर्भाव नसला तरी पुढील आवश्यक उपाययोजना व शेतकऱ्यांनी त्यांच्या पशुधनाबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. लम्पी स्किन रोग हा गोट पॉक्स विषाणु (देवी) लम्पी स्किन रोग विषाणुमुळे गायवर्ग व म्हैसवर्ग जनावरामध्ये होतो.          या रोगाची लक्षणे- सुरुवातीचे २-३ दिवस हलका ताप येतो त्यानंतर जनावराच्या कातडीवर साधारणत: २-५ सेमी आकाराच्या घट्ट गाठी येतात. याशिवाय काही बाधित जनावरांच्या तोंडामध्ये, श्वसन नलिकेमध्ये, घशामध्ये गाठी येतात. दुध देण्याचे प्रमाण कमी होते. अशी लक्षणे गावातील पाळीव जनावरांना दिसुन आल्यास सचिवांमार्फत तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना तसेच गट विकास अधिकारी व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. लम्पी स्किन रोगाचा प्रसार माशा, गोचिड, डास व पिसवा इत्यादीपासुन होतो.   

पिकांच्या उत्पादन वाढीसाठी एकदिवशीय कार्यशाळा संपन्न

Image
पिकांच्या उत्पादन वाढीसाठी एकदिवशीय कार्यशाळा संपन्न           वाशिम, दि.  30  (जिमाका) :  सन 2022-23 या वर्षात  केंद्र शासनाने तुर, मसुर व उडीद पिकाची क्षेत्र उत्पादन व उत्पादकता वाढीकरीता संपूर्ण देशामध्ये 370 जिल्हयाची निवड केली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यात तुर पिकाची उत्पादकता वाढ करण्याच्या दृष्टिने कमी उत्पादकता असलेल्या 16 जिल्हयाचा समावेश करण्यात आला आहे. याकरीता अधिकारी/कर्मचारी यांची कार्यशाळा घेऊन तुर पिकाच्या उत्पादकता वाढविण्याकरीता मानक कार्यरत प्रणाली निश्चित करून त्याचा अवलंब करण्याकरीता रोडमॅप तयार करण्यासाठी 25 ऑगस्ट रोजी आत्मा सभागृह येथे अधिकारी/कर्मचारी यांची एकदिवशीय कार्यशाळा संपन्न झाली.           कार्यशाळा घेण्याचा उद्देश प्रास्ताविकातून तंत्र अधिकारी दिलीप कंकाळ यांनी सविस्तरपणे विषद केला. तुर पिकाबाबत प्रादेशिक कृषि संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. भरत यांनी मार्गदर्शन केले. तूर पिकावरील किड व रोगाबाबत कृषी विज्ञान केंद्र, करडाचे किटकशास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी माहिती दिली. कार्यशाळेकरीता जिल्हयातील सर्व तालुका कृषि अधिकारी, सर्व मंडळ कृष

पीएम किसान योजना आज ई-केवायसी मुदतीचा शेवटचा दिवस

Image
पीएम किसान योजना आज ई-केवायसी मुदतीचा शेवटचा दिवस सीएससी/आपले सरकार केंद्र किंवा मोबाईलवरुन ई-केवायसी करावी  शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन           वाशिम, दि.  30  (जिमाका) :  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्हयात १ लक्ष ८९ हजार ३४४ लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. अद्यापपर्यंत जिल्ह्यातील ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्या लाभार्थी शेतकऱ्यांनी आज 31 ऑगस्ट या ई-केवायसी करण्याच्या शेवटच्या दिवशी ई-केवायसी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.            जिल्हयात प्रलंबित असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपूर्वी कोणत्याही परिस्थीतीत ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहे. जे लाभार्थी शेतकरी ई-केवायसी प्रक्रीया पुर्ण करणार नाही, त्यांना ऑगस्ट 2022 आणि त्यानंतरच्या या योजनेच्या हप्त्याचे अनुदान मिळणार नाही. त्यामुळे जिल्हयातील या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या 64 हजार ६82 लाभार्थी श

सप्टेंबर अखेरपर्यंत कॅच द रेन मोहिमेची कामे पुर्ण करा वसमुना पंत

Image
सप्टेंबर अखेरपर्यंत कॅच द रेन मोहिमेची कामे पुर्ण करा                                                                             वसमुना पंत ·         आतापर्यंत 8 लक्ष 49 हजार कामे पुर्ण           वाशिम, दि.  29  (जिमाका) :  भुगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासोबतच जलसंवर्धनाची कामे करतांना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविला पाहिजे. यंत्रणांना जलशक्ती अभियानांतर्गत कॅच द रेन मोहिमेच्या कामांचे उदिष्ट दिले आहे, हे उदिष्ट यंत्रणांनी सप्टेंबर 2022 अखेरपर्यंत पुर्ण करावे. असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिले.           आज 29 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियानांतर्गत कॅच द रेन मोहिमेचा आढावा घेतांना श्रीमती पंत बोलत होत्या. सभेला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, जिल्हा परिषेदच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ए.आर. वानखेडे, जिल्हा भुजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भुवैज्ञान

वस्तुनिष्ठ पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश · जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची सभा

Image
वस्तुनिष्ठ पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश ·         जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची सभा           वाशिम, दि.  30  (जिमाका) :  जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करण्यात यावे. जेणेकरुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या खरीप हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना मदत करता येईल. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.         आज 30 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2022-23 अंतर्गत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची सभा श्री. षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनेश बारापात्रे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार, कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ भरत गिते, शेतकरी सुरेश सानप, अनिल पाटील, राधेश्याम मंत्री व पिक विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक सोमेश

शहरी भागात नियमित लसीकरणासोबतच संबंधित सेवांची प्रभावी अंमलबजावणी करा षण्मुगराजन एस.

Image
शहरी भागात नियमित लसीकरणासोबतच संबंधित सेवांची प्रभावी अंमलबजावणी करा                          षण्मुगराजन एस.   जिल्हास्तरीय लसीकरण शीघ्र कृती दल समिती सभा  वाशिम दि.२७(जिमाका) ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. तसेच संबंधीत सेवाही पूर्णपणे राबविल्या जात नाही. यापुढे शहरी भागात नियमितपणे लसीकरणासोबत संबंधित सेवांची सूक्ष्म नियोजनातून प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. दिले.         २५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात शहरी भागातील लसीकरण व संबंधित सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय लसीकरण शीघ्र कृती दलाची सभा जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विजय काळवांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष कोरे, जिल्हा मात व बाल संगोपन अधिकारी डॉ मिलिंद जाधव, नोडल अधिकारी डॉ. वीरू मनवर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. डी. आर ससे,शिक्षण विस्तार धिकारी अशोक आगलावे,वाशिम तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनीषा चव्हाण, कारंजा

दिव्यांगांनी ऑनलाईन अर्ज केल्यावर संबंधित विशेषतज्ञाकडून तपासणी करावी बुधवार हा तपासणीचा दिवस निश्चित

Image
दिव्यांगांनी ऑनलाईन अर्ज केल्यावर संबंधित विशेषतज्ञाकडून तपासणी करावी  बुधवार हा तपासणीचा दिवस निश्चित  वाशिम दि.२७ ( जिमाका) केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ संमत केला आहे. या कायद्यामध्ये प्रकरण १० मधील कलम ५६,५७ आणि ५८ नुसार २१ दिव्यांग प्रकारचा समावेश केला आहे. दिव्याने व्यक्तीने ऑनलाईन अर्ज केल्यानंतर शासकीय रुग्णालय, वाशिम येथे संबंधित विशेषतज्ञकडून तपासणी करणे आवश्यक आहे. या तपासणीकरिता बुधवार हा दिवस निश्चित करण्यात आला आहे.       २१ प्रकारच्या दिव्यांग प्रकारांमध्ये दृष्टीदोष(अंधत्व), कर्णबधिरता, शारीरिक दिव्यंगता,मानसिक आजार, बौद्धिक दिव्यंगता,बहुदिव्यंगता, शारीरिक वाढ खुंटणे,स्वमग्नता,मेंदूचा पक्षघात,स्नायूंची विकृती, मज्जासंस्थेचे जुने आजार,अध्ययन अक्षमता,मल्टिपल स्क्लेरॉसिस,वाचा व भाषा दोष,थॅलेसेमिया, हिमोफिलिया,सिकलसेल डिसीज, ऍसिड अटॅक व्हीकटीम,पार्किनसन्स डिसीज,दृष्टीक्षीणता आणि कुष्ठरोग यांचा समावेश आहे.या आजाराच्या दिव्यांग प्रमाणपत्राकरिता लाभार्थ्यांनी ऑनलाईन www.swavalambancard.gov.in या संकेतस्थळावर IV(17) (1) मधील विहीत नमुन्यात अर्ज

क्रेन ऑपरेटरच्या चुकीमुळे क्रेन स्लिप झाल्याने गर्डर कोसळला

Image
क्रेन ऑपरेटरच्या चुकीमुळे क्रेन स्लिप झाल्याने गर्डर कोसळला  वाशिम दि.२६ (जिमाका) हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावरील महामार्ग पॅकेज क्रमांक ५ मधील मालेगाव तालुक्यातील साखळी क्रमांक २१९ /२३३ वरील वाहनांसाठी उन्नत मार्गाच्या ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने काँक्रीट गर्डर पुलावर ठेवण्याचे काम २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:३० वाजता सुरू असताना क्रेन ऑपरेटरच्या चुकीमुळे क्रेन स्लिप होऊन गर्डर पूर्ण चढण्यापूर्वीच जमिनीवर कोसळले. पूल कोसळला नसून दुर्दैवाने क्रेन घसरल्याने हा अपघात झाला. अपघाताच्या ठिकाणी कोणतीही जीवित व वित्तीय हानी झाली नसल्याची माहिती अमरावती येथील ना.मु.शि.द्रु.म.(मर्या) शिबिर कार्यालयाचे मुख्य अभियंता तथा प्रकल्प संचालक यांनी एका निवेदनातून दिली.

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

Image
प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना   तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न वाशिम दि.२६ (जिमाका) तालुका कृषी अधिकारी कार्यालय,वाशिमच्या वतीने २५ ऑगस्ट रोजी आत्मा कार्यालय वाशिम येथे प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेवर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या  प्रारंभी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.             याप्रसंगी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनेश बारापात्रे,कृषी उपसंचालक निलेश ठोंबरे,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी संशोधन प्रकल्प वाशिमचे प्रभारी अधिकारी भारत गीते, कृषी विज्ञान केंद्र करडा येथील कीटकशास्त्रज्ञ राजेश डवरे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम कार्यालयातील तंत्र अधिकारी श्री. धनोडे,श्रीमती लंगोटे, श्री दिलीप कंकाळ,वाशिम तालुका कृषी अधिकारी अनिल कंकाळ,कृषी अधिकारी प्रकाश कोल्हे, मंडळ कृषी अधिकारी उमेश राठोड, पी.एम.एफ एम.ई. जिल्हा समन्वयक श्री मुठाळ  यांची प्रमुख उपस्थिती होती.       श्री. ठोंबरे यांनी पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, श्री मुठाळ यांन

जिल्हाधिकाऱ्यांनी केली ई-पीक पाहणी सीएससी केंद्राला भेट व इमारत बांधकामाची पाहणी

Image
जिल्हाधिकाऱ्यांनी केली ई-पीक पाहणी सीएससी केंद्राला भेट व इमारत बांधकामाची पाहणी           वाशिम, दि.  25  (जिमाका) :  जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 25 ऑगस्ट रोजी कारंजा तालुक्यातील गायवळ, शेलूवाडा व कोळी या गावांना भेट देऊन ई-पीक पाहणी केली व उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून सध्याच्या पीक परिस्थीतीची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत तहसिलदार धीरज मांजरे, तालुका कृषी अधिकारी श्री. चौधरी व संबंधित गावचे तलाठी उपस्थित होते.            श्री. षण्मुगराजन यांनी ई-पीक पाहणी मोबाईलच्या ॲपवरुन शेतकऱ्यांना करता येते का तसेच ई-पीक पाहणी करतांना येणाऱ्या अडचणी याबाबतची माहिती उपस्थित शेतकऱ्यांकडून घेतली. ई-पीक पाहणीबाबत शेतकऱ्यांमध्ये तलाठी व कृषी सहायक यांनी मोठया प्रमाणात जनजागृती करावी. शेतकऱ्यांना याबाबत येत असलेल्या अडचणी सोडविण्याचे निर्देश त्यांनी तलाठी व कृषी सहायकांना दिले. कारंजा शहरातील सीएसएसी केंद्राला भेट देऊन प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या ई-केवायसीबाबतची माहिती त्यांनी घेतली. शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल ॲपवरुन किंवा न

मतदार ओळखपत्रासोबत आधार लिंक करा

Image
मतदार ओळखपत्रासोबत आधार लिंक करा          वाशिम, दि. 25 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांचे मतदार ओळखपत्रासोबत आधार लिंकींग करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मतदार याद्यांच्या प्रमाणीकरणासाठी मतदारांची दुबार नावे वगळण्यासाठी, आधारकार्ड माहितीला दुहेरी सुरक्षितता इत्यादी करीता मतदारांच्या मतदार ओळखपत्रासोबत त्यांचे आधार लिंक करणे आवश्यक आहे. मतदार ओळखपत्रासोबत आधार लिंकींग करण्याकरीता मतदारांनी निवडणूक शाखा, तहसिल कार्यालय, किंवा आपल्या क्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा. आधार लिंकीग संबंधित अर्ज क्रमांक ६ भरुन ही प्रक्रिया पूर्ण करता येते किंवा मतदार स्वत: Voter Help Line अॅपव्दारे आपल्या मतदार ओळखपत्राला आधारकार्ड लिंकींग करु शकतात. त्यामुळे वाशिम विधानसभा मतदार संघातील सर्व मतदार नागरीकांनी आपल्या मतदार ओळखपत्रासोबत आपले व कुटूंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंकींग तातडीने करावे. असे आवाहन वाशिमचे तहसिलदार विजय साळवे यांनी केले आहे. *******

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान महाडिबीटी पोर्टलवर अर्ज आमंत्रित

Image
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान महाडिबीटी पोर्टलवर अर्ज आमंत्रित फळे, फुले, मसाला पीक लागवड व जुन्या फळबागांचे होणार पुनरुज्जीवन           वाशिम, दि.  25  (जिमाका) :  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या जुन्या बागांचे पुनरुज्जीवन या बाबींचा समावेश आहे. राज्यात विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या घटकांना देण्यात येणार अनुदान पुढीलप्रमाणे.           कट फ्लॉवर्सकरीता- अल्प भुधारक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी अनुदान 1 लक्ष रुपये. एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार रुपये अनुदान प्रति हेक्टरी मर्यादा असणार आहे. इतर शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी अनुदान 1 लक्ष रुपये असून एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 25 हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान मर्यादा. कंदवर्गीय फुलांसाठी- अल्प भुधारक श

मानोरा येथे महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा शुभारंभ

Image
मानोरा येथे महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा शुभारंभ           वाशिम, दि.  25  (जिमाका) :  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत काढण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा जिल्हयात मानोरा येथे आज 25 ऑगस्ट रोजी शुभारंभ करण्यात आला. मानोरा येथील शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत या यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही. डी. राठोड, पी.पी. जामकर, श्री. रोठे, श्रीमती लांजुरकर, श्री. जवंजाळ, श्री. ठाकूर व श्री. भोळसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी स्टार्टअप व नाविन्यता यात्रेची माहिती डिजीटल वॉलवरुन दाखविण्यात आलेल्या यशोगाथा व कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेतली.           मानोरा येथील मातोश्री सुभद्राबाई पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयातील वि

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा 33 हजार 489 महिलांना लाभ

Image
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा 33 हजार 489 महिलांना लाभ           वाशिम, दि.  25  (जिमाका) :  ग्रामीण आणि शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील आणि दारिद्रय रेषेवरील कष्टकरी गर्भवती महिला, तनदा माता आणि त्यांचे नवजात बालके कुपोषित राहू नये तसेच मातामृत्यू आणि बालमृत्यू दरात घट व्हावी यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात येत आहे. जिल्हयात आतापर्यंत 33 हजार 489 महिलांना याचा लाभ मिळाला आहे.           गर्भवती आणि स्तनदा मातांना 5 हजार रुपयांचा लाभ प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या माध्यमातून देण्यात येतो. 1 जानेवारी 2017 पासून या योजनेची सुरुवात झाली आहे. 24 ऑगस्टपर्यंत 2022 पर्यंत जिल्हयातील 33 हजार 489 महिलांना या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ देण्यात आला असून या महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 12 कोटी 21 लक्ष 11 हजार रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती व स्तनदा मातेला 1 हजार रुपये, 2 हजार रुपये आणि 2 हजार रुपये अशा तीन टप्प्यात एकूण 5 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात.           वाशिम तालुक्यात 7 हजार 369, मालेगांव 4 हजार

तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत व्यापक जनजागृती करावी षण्मुगराजन एस.

Image
तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत व्यापक जनजागृती करावी                                                                         षण्मु गराजन एस. तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सभा           वाशिम, दि.  25  (जिमाका) :  शाळा तसेच शासकीय कार्यालयाच्या इमारत परिसरात कोणताही कर्मचारी किंवा कामानिमित्ताने येणारा व्यक्ती हा गुटखा व तंबाखू खाऊन धुम्रपान करणार नाही याची दक्षता घ्यावी. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती देऊन त्यांच्यामध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.           जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात 24 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आयेाजित सभेत अध्यक्षस्थानावरुन श्री. षण्मुगराजन बोलत होते. सभेला जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. आदित्य पांढारकर, वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे प्रतिनिधी श्री. ठोंबरे, कामगार विभागाच्या श्रीमती खोंड, शिक्षण विस्तार अधिकारी श्

29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन विविध स्पर्धा व खेळाडूंचा सत्कार

Image
29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन विविध स्पर्धा व खेळाडूंचा सत्कार           वाशिम, दि.  24  (जिमाका) :  हॉकीचे जादुगर माजी ऑलिंपीक खेळाडू स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिनानिमित्त 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या वतीने प्रभातफेरी, विविध खेळांचे आयोजन, खेळाडूंचा सत्कार आणि प्रात्याक्षीके आदी उपक्रम राबविले जाणार आहे. यामध्ये कबड्डीच्या स्पर्धा, कराटे प्रात्याक्षीक, आर्चरी स्पर्धा व राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच विविध स्पर्धांचे तसेच जिल्हा क्रीडा संकुलात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील ज्या खेळाडूंना वरील स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे व बालाजी शिरसीकर यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले आहे. *******

पीएम किसान योजना : 31 ऑगस्टपर्यंत ई-केवायसीची मुदत· 64 हजार ६82 लाभार्थी शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी

Image
पीएम किसान योजना : 31 ऑगस्टपर्यंत ई-केवायसीची मुदत ·         64  हजार ६ 82  लाभार्थी शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी           वाशिम, दि.  24  (जिमाका) :  जिल्हयात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण १ लक्ष ८९ हजार ३४४ लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. अद्यापपर्यंत जिल्ह्यात एकूण १ लक्ष २4 हजार ६62 लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे. अजुनही 64 हजार ६82 लाभार्थी शेतकरी ई-केवायसी पूर्ण करणे बाकी आहे.            प्रलंबित असलेल्या 64 हजार ६82 लाभार्थी शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपूर्वी कोणत्याही परिस्थीतीत ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करण्याचे शासनाने निर्देश आहे. जे लाभार्थी शेतकरी ई-केवायसी प्रक्रीया पुर्ण करणार नाही, त्यांना ऑगस्ट 2022 आणि त्यानंतरच्या या योजनेच्या हप्त्याचे अनुदान मिळणार नाही. त्यामुळे जिल्हयातील या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या 64 हजार ६82 लाभार्थी शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट 2022 पूर्वी ई-केवायसी प्रक्रीया पुर्ण करावी. जेणेकरुन त्यांना पुढील लाभ देणे सोयीचे होईल.

बाल न्याय मंडळात परिसंवाद कार्यक्रम संपन्न

Image
बाल न्याय मंडळात परिसंवाद कार्यक्रम संपन्न               वाशिम, दि.  24  (जिमाका) :  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच वाशिम येथील बाल न्याय मंडळात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी व बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती आर.बी. सोरेकर यांनी बाल न्याय मंडळाचे सदस्य व बाल कल्याण समितीचे सदस्य यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी बाल न्याय मंडळाच्या सदस्या ॲड. प्रतिभा वैरागडे यांनी बाल न्याय मंडळाची प्रक्रिया याबाबतची माहीती दिली.        कार्यक्रमास बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. अलका मकासरे, बाल कल्याण समितीचे सदस्य ॲड. विनोद पट्टेबहादुर, ॲड. बालाजी गंगावणे,  ॲड. ए. जे. उंडाळ, बाल न्याय मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. संदीप शिंदे, जिल्हा विधिज्ञ संघाचे सचिव ॲड. एस. एन. खराटे,  ॲड. विनोद सानप,  ॲड. उषा भगत,  ॲड. डी. के. सांबर,  ॲड. धनराज पडघान, संरक्षण अधिकारी लक्ष्मी काळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक एस. एन. भुरे, इतर कर्मचारी वर्ग व बाल न्याय मंडळाचे शिक्षक श्री. मोरे आदींच

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न

Image
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न            वाशिम, दि.  24  (जिमाका) :  विधी व न्याय विभागाच्या कॉमन मिनीमम प्रोग्रामअंतर्गत २२ ऑगष्ट रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ मंडळ, वाशिम यांच्या संयुक्तवतीने आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम यांच्या सहकार्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे “ ट्रॅफिक रुल्स ” या विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले.           कार्यक्रमास जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद, जिल्हा विधिज्ञ संघाचे सचिव अॅड. एस. एन. खराटे, अॅड. ए. पी. वानरे व प्रमुख वक्ते म्हणून सहाय्यक परिवहन अधिकारी सतिष इंगळे यांची उपस्थिती होती.           श्री. इंगळे यांनी रस्त्यावरील देवदुत या विषयावर बोलतांना सांगीतले की, कोणत्याही प्रकारची मनात भिती न बाळगता रस्त्यावर घडलेल्या अपघातग्रस्तांना मदत करावी. अशाप्रकारे मदत करणाऱ्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारची पोलीसांकडुन विचारपुस केली जाणार नाही. तसेच कोणतेही रुग्णालय खर्च मागणार नाही. याबाबत कायदेविषयक

राष्ट्रीय नमुना पाहणीची ७९ वी फेरी क्षेत्रीय सर्वेक्षण कार्यक्रम जाहिर

Image
राष्ट्रीय नमुना पाहणीची ७९ वी फेरी क्षेत्रीय सर्वेक्षण कार्यक्रम जाहिर           वाशिम, दि.  24  (जिमाका) :  भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वये मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत १९५० पासुन दरवर्षी नमुना पाहणी करण्यात येते. या अतंर्गत विविध योजनांचा आराखडा तयार करण्यासाठी व सामाजिक आर्थिक निर्देशांकाची परिगणना करण्यासाठी माहिती गोळा करण्यात येते.           राष्ट्रीय नमुना पाहणी ७९ वी फेरीमध्ये सामाजिक आर्थिक निर्देशांकावरील सर्व सामावेशक माहिती गोळा करण्यात येणार आहे. यात सुरक्षित व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सेवा वापरणाऱ्या लोकसंखेचे प्रमाण, स्वच्छता करीता असलेल्या पायाभूत सोयी-सुविधा, संगणक व मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या, इंटरनेट सुविधा वापरणाऱ्या व्यक्तींची टक्केवारी, बँकेत खाते असणाऱ्या महिलांची टक्केवारी, शालेय शिक्षणाची सरासरी, आयुष प्रणालीबाबत जनतेमधील जागरुकता व वैद्यकीय खर्च इत्यादी बाबींची माहिती या माध्यमातून गोळा केली जाणार आहे. या आधारे शाश्वत विकास ध्येयमधील निर्देशांक व जागतीक स्तरावरील उप निर्देशांक काढण्यास मदत होणार आहे.   

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना जनजागृती पंधरवाडा

Image
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना जनजागृती पंधरवाडा           वाशिम, दि.  24  (जिमाका) :  प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजनेला व्यापक स्वरूप देण्यासाठी १५ ते ३१ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत कृषि प्रक्रीया जागृती पंधरवडा साजरा केला जात आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये उलेखनीय कामगीरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आले आहे. सर्व ग्रामसभेत कृषी सहाय्यकामार्फत योजनेचा प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे.           इच्छुक पात्र लाभार्थ्यांची आवश्यक दस्तावेजाच्या प्रती घेऊन माहिती जिल्हा संसाधन व्यक्तीकडे सुपुर्द करतील. १६ ते ३१ ऑगस्टदरम्यान बँकांकडे जे प्रकल्प आराखडे मंजुरीसाठी सादर केले आहेत, त्यांचे बँकांच्या शाखा व्यवस्थापकांची एकदिवशीय कर्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची बँक अधिकाऱ्या समक्ष पडताळणी करून त्रुटींची पूर्तता करून घेण्यात येणार आहे. जिल्हा संसाधन व्यक्ती सर्व लाभार्थ्यांचे सविस्तर प्रकल्प आराखडे तयार क