उत्साहात निघाली सायकल तिरंगा रॅली
उत्साहात निघाली सायकल तिरंगा रॅली
वाशिम दि.13 (जिमाका)भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज 13 ऑगस्ट रोजी वाशीम येथे सायकल तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे,जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सागर हवालदार,जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता,सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे,जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखाधिकारी युसुफ शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कार्यालय येथून मार्गक्रमण करीत ही रॅली सिव्हिल लाईन मार्गे बस स्टँड, पुसद नाका,उड्डाण पुलावरून पुढे शेलुबाजारमार्गावरील आसोला, माळेगावपर्यंत 10 किलोमीटर अंतर आणि पुढे तांदळी( शेवई) कोंढाळा व पिंपरी(अवगण) जवळील राधास्वामी सत्संग परिसरापर्यंत पोहोचून तेथून परत त्याच मार्गाने घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅली पोहचली.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी,श्री बाकलीवाल विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी,वाशिम रॅनोडियर्स क्लबचे सदस्य व केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला.विशेष म्हणजे श्री.शिवाजी किड्सचा इयत्ता 4 चा विद्यार्थी अक्षित मोरे हा सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी होता. जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
Comments
Post a Comment