माविम कार्यालयात समूह राष्ट्रगीत गायन
माविम कार्यालयात
समूह राष्ट्रगीत गायन
वाशिम दि.१७ (जिमाका) आज १७ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य सप्ताहांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) जिल्हा कार्यालय येथे सकाळी ११ वाजता समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले.
माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे,सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख, सहाय्यक नियंत्रण अधिकारी कल्पना लोहकपुरे(काळे), कार्यक्रम अधिकारी प्रांजली वासाके यांचेसह कार्यालयातील व लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचारी सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment