सांस्कृतीक कार्यक्रमातील गीतांनी वातावरण झाले देशभक्तीमय ऑर्केस्ट्रातील गायक व विद्यार्थ्यांच्या गायनाला मिळाला उत्स्फुर्त प्रतिसाद



सांस्कृतीक कार्यक्रमातील गीतांनी

वातावरण झाले देशभक्तीमय

ऑर्केस्ट्रातील गायक व विद्यार्थ्यांच्या गायनाला मिळाला उर्त्स्फुत प्रतिसाद

          वाशिम, दि. 17 (जिमाका) : संपूर्ण देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हयात सुध्दा या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. नुकताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने सायंकाळी नियोजन भवन येथे सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात नाशिक येथील सेव्हन स्टार ऑर्केस्ट्रातील कलावंतांनी ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून विविध देशभक्तीवरील गीत सादर केले. वाशिम शहरातील नवोदित बाल गायकांना या मंचावरुन देशभक्ती गाणे गाण्याची संधी मिळाली. ऑर्केस्ट्रातील गायक आणि शहरातील बाल गायकांनी देशभक्ती गाणे सादर करुन उपस्थितांकडून प्रचंड टाळयांचा प्रतिसाद घेतला.

           देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखाधिकारी युसुफ शेख, धर्मराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

           ऑर्केस्ट्रातील गायक शिवाजी साठे यांच्यासह अन्य गायकांनी विविध देशभक्ती गीत सादर केले. सुदर्शन कांबळे या विद्यार्थ्यांनी मेरा मुल्क मेरा देश, सोनाश्री चव्हाण हिने देश रंगीला, धनेश बंग व प्रियल खराटे यांनी ए मेरे वतन के लोगो, साक्षी बलखंडे हिने मेरा कर्मा तु मे धर्मा, गरीमा वानखेडे हिने तेरी मिठ्ठी मे मिलजाँवा, नर्सिंग कॉलेजची विद्यार्थींनी स्वप्नाली राऊत हिने ए देश मेरे तेरी शान पे सदके, पल्लवी कांबळे हिने मॉ तुझे सलाम, लॉयन्स विद्यानिकेतनची सत्यप्रिया श्रृंगारे हिने भारत हमको जान से प्यारा है, बीएन बॉईज ग्रुपचे अक्षय राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेरी मिठ्ठी मे लि जाँवा, केंद्रीय विद्यालयाच्या मुकेश राव यांनी मै रहु या ना रहु भारत ये रहेना चाहिऐ, लोककलावंत उत्तम इंगोले व हरिचंद्र पोफळे यांनी मेरी जान जाए वतन के लिए, केंद्रीय विद्यालयाच्या आदिती व्यवहारे यांनी ए मेरे वतन के लोगो, दिशा रणमले हिने वंदे मातरम, केंद्रीय विद्यालयाची उत्कर्षा भगत हिने अमन का सफर, पोद्दार विद्यालयाचा स्नेहल देशमुख यांनी मेरा मुल्क मेरा देश आणि केंद्रीय विद्यालयाचा स्मित देशमुख याने अय वतन आबाज रहे तू आदी देशभक्ती गीत सादर करुन गायक आणि बाल गायकांनी उपस्थितांकडून प्रशंसा मिळविली. या कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत यांनी मानले.       

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे