बाल न्याय मंडळात परिसंवाद कार्यक्रम संपन्न



बाल न्याय मंडळात

परिसंवाद कार्यक्रम संपन्न

 

           वाशिम, दि. 24 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच वाशिम येथील बाल न्याय मंडळात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी व बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती आर.बी. सोरेकर यांनी बाल न्याय मंडळाचे सदस्य व बाल कल्याण समितीचे सदस्य यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी बाल न्याय मंडळाच्या सदस्या ॲड. प्रतिभा वैरागडे यांनी बाल न्याय मंडळाची प्रक्रिया याबाबतची माहीती दिली.

       कार्यक्रमास बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. अलका मकासरे, बाल कल्याण समितीचे सदस्य ॲड. विनोद पट्टेबहादुर, ॲड. बालाजी गंगावणे,  ॲड. ए. जे. उंडाळ, बाल न्याय मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. संदीप शिंदे, जिल्हा विधिज्ञ संघाचे सचिव ॲड. एस. एन. खराटे,  ॲड. विनोद सानप,  ॲड. उषा भगत,  ॲड. डी. के. सांबर,  ॲड. धनराज पडघान, संरक्षण अधिकारी लक्ष्मी काळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक एस. एन. भुरे, इतर कर्मचारी वर्ग व बाल न्याय मंडळाचे शिक्षक श्री. मोरे आदींची उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार परिविक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी यांनी मानले.

                                                                                                                                                    *******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे