घरोघरी तिरंगा जिल्हा परिषदेतील ध्वज विक्री केंद्रातून १२००
- Get link
- X
- Other Apps
घरोघरी तिरंगा
जिल्हा परिषदेतील ध्वज विक्री केंद्रातून १२०० ध्वजाची शिक्षकांकडून खरेदी
वाशिम दि.५(जिमाका) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने घरोघरी तिरंगा उपक्रमासाठी जिल्हा परिषद,वाशिम येथील राष्ट्रध्वज विक्री केंद्रात ४ ऑगस्ट रोजी रिसोड तालुक्यातील मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी १२०० राष्ट्रध्वजाची खरेदी केली.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, शिक्षणाधिकारी(माध्यमिक) रमेश तांगडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय जोल्हे यांच्या हस्ते मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. विनोद नरवाडे, जिल्हा समुपदेशक प्रा.दिनकर सरकटे, रिसोड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा साहेबराव जाधव, वाशिम तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. संतोष राठोड,मोपचे पर्यवेक्षक संजय नरवाडे,रिठदचे पर्यवेक्षक ए.जी. देशमुख यांना राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापकांनी राष्ट्रध्वज त्वरित खरेदी करावे. असे आवाहन शिक्षणाधिकारी(माध्यमिक) रमेश तांगडे यांनी केले आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment