स्टार्टअप व नाविन्यता यात्रा 25 ऑगस्टपासून जिल्हयात
- Get link
- X
- Other Apps
स्टार्टअप व नाविन्यता यात्रा
25 ऑगस्टपासून जिल्हयात
वाशिम, दि. 23 (जिमाका) : नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत “ महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण-2018 ” जाहिर केले आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यात स्टार्टअपच्या विकासाकरीता पोषक वातावरण निर्मिती करुन त्यामधून यशस्वी उद्योजक घडविण्यासाठी तसेच राज्यातील नागरीकांच्या नवसंकल्पनांना मुर्त स्वरुप देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात या यात्रेचे आगमन 25 ऑगस्टला होणार आहे.
25 ऑगस्ट रोजी मानोरा तालुक्यातील मानोरा येथे दुपारी 2 वाजता मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय येथे. दुपारी 4 वाजता बस स्टॅन्ड चौक मानोरा. 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता कारंजा (लाड) येथील विद्याभारती कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय. सकाळी 11 वाजता के. एन. महाविद्यालय. दुपारी 12 वाजता कारंजा (लाड) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था. दुपारी 2 वाजता मंगरुळपीर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था. दुपारी 3 वाजता श्री. वसंतराव नाईक वरिष्ठ महाविद्यालय. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता रिसोड येथील उत्तमचंद बगडीया महाविद्यालय. सकाळी 11 वाजता भारत वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय. दुपारी 1 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि 3 सप्टेंबर रोजी वाशिम येथील मातोश्री शांताबाई गोटे वरिष्ठ महाविद्यालय. 10 वाजता शासकीय तंत्रनिकेतन, वाशिम येथे, दुपारी 12 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था. दुपारी 1 वाजता राजस्थान महाविद्यालय. दुपारी 2 वाजता मालेगांव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि दुपारी 4 वाजता आमखेडा येथील कृषी महाविद्यालय येथे या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी जिल्हयातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजक उमेदवारांनी या यात्रेत आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment