अधिकाऱ्यांकरीता निबंध स्पर्धा ९ ऑगस्टपूर्वी निबंध मागविले

अधिकाऱ्यांकरीता निबंध स्पर्धा 
९ ऑगस्टपूर्वी निबंध मागविले 

वाशिम दि.४ (जिमाका) भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकरीता निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
  निबंध स्पर्धेचा विषय " परिवर्तनशील भारत घडविण्याच्या संकल्पना " (Seeking Ideas For Transforming India) हा आहे. या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या अधिकाऱ्यांनी इंग्रजी किंवा मराठी भाषेत त्यांचा वरील विषयावरील निबंध ३०० शब्द मर्यादेत फुलस्केप पेपरवर एका बाजूने स्वहस्ताक्षरात लिहून मानव विकास विभाग, नियोजन भवन,वाशिम येथे ९ ऑगस्ट पूर्वी सादर करावे. 
       अधिकाऱ्यांनी आपली स्वाक्षरी करून त्यांचे नाव, कार्यालयाचे नाव व मोबाईल क्रमांक लिहावा.उत्कृष्ट प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.उत्कृष्ट असलेले निबंध निती आयोगाला पाठविण्यात येईल.असे जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) राजेश सोनखासकर यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे