महारेन प्रणालीवर पावसाचा दैनंदिन व प्रागतिक अहवाल उपलब्ध
- Get link
- X
- Other Apps
महारेन प्रणालीवर पावसाचा
दैनंदिन व प्रागतिक अहवाल उपलब्ध
वाशिम, दि. 23 (जिमाका) : महावेध प्रकल्पाला सार्वजनिक खाजगी भागीदारीतून बांधा-मालक व्हा-चालवा या तत्वावर अंमलबजावणी करण्याकरीता प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि. यांची या प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरीता सेवा पुरवठादार संस्था म्हणुन नियुक्ती केली आहे. प्रकल्पातंर्गत राज्यात महसुल मंडळस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
पर्जन्यमानाची आकडेवारीसाठी महारेन व महावेध या दोन स्वंतत्र प्रणाली कार्यान्वित ठेवण्याऐवजी महावेध प्रणालीमधील पर्जन्यविषयक आकडेवारी महारेन संकेतस्थळावर प्रकाशित केली जाते. महावेध प्रकल्पातील पर्जन्यमानाची आकडेवारी दररोज API लिंकव्दारे महारेन संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येते.
महावेध ही प्रणाली स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि. यांनी विकसित केलेली आहे. त्यामधील एक वर्षापूर्वीची हवामानविषयक आकडेवारी सर्वांसाठी उपलब्ध आहे. महारेन ही प्रणाली सार्वजनिक संकेतस्थळावर (maharain.maharashtra.gov.in) आहे. त्यावर दैनंदिन व प्रागतिक पर्जन्यमानाची आकडेवारी सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महारेन प्रणालीच्या अत्यावश्यक तांत्रिक देखभालीसाठी 6 जुलै 2022 पासून सदरचे संकेतस्थळ "Under Maintenance” मध्ये ठेवण्यात आले होते. परंतु असे असतांना देखील शेतकऱ्यांना दैनंदिन पर्जन्यमान पाहण्याकरीता थेट महावेध संकेतस्थळाच्या external लिंकव्दारे महारेन संकेतस्थळावर दैनंदिन व प्रागतिक पर्जन्यमानाची आकडेवारी प्रकाशित करून सर्वांना उपलब्ध करून देण्यात येत होती. त्यामुळे संकेतस्थळ "Under
Maintenance” असतांनाही दैनंदिन पर्जन्यमानाची आकडेवारी उपलब्ध करून देण्यामध्ये शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ दिलेली नाही. सद्यस्थितीत महारेन प्रणालीमध्ये तांत्रिक सुधारणा पूर्ण करण्यात आल्या आहे. पर्जन्यमानाचे महसूल मंडळनिहाय दैनंदिन व प्रागतिक अद्यावत अहवाल 22 ऑगस्टपासून प्रकाशित करण्यात येत आहेत. त्यामुळे महसूल मंडळनिहाय दैनंदिन व प्रागतिक पर्जन्यमानाच्या आकडेवारीसाठी maharain.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment