12 ऑगस्ट रोजी मोटार सायकल रॅली
- Get link
- X
- Other Apps
12 ऑगस्ट रोजी
मोटार सायकल रॅली
वाशिम, दि. 10 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने 12 ऑगस्ट रोजी मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचा शुभारंभ सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून करण्यात येईल. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथून सिव्हील लाईनमार्गे श्रीमती मालतीबाई सरनाईक शाळा बस स्टॅन्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, दिघेवाडी, बालू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाटणी चौक, श्री. शिवाजी विद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, श्रीमती मालतीबाई सरनाईक शाळा बस स्टॅन्ड, नवीन नगर परिषद कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, आहाळे हॉस्पीटल व राजस्थान आर्य महाविद्यालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅलीचा समारोप होईल.
रॅलीमध्ये जिल्हयातील ज्या सुपुत्रांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली अशा वीर सैनिकांच्या कुटूंबियांची मिरवणूक काढून देशप्रेम व राष्ट्रीय एकात्मता मनात कायम तेवत राहावी यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. नागरीकांनी या रॅलीदरम्यान या वीर सैनिकांच्या कुटूंबियांवर पुष्प वर्षाव करावा तसेच त्यांचे चौका चौकात उत्साहाने स्वागत करावे.
रॅलीमध्ये 75 होमगार्डस, 75 पोलीस आणि 75 राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, पोलीस बँडपथक तसेच नागरीक सहभागी होणार आहे. रॅली दरम्यान वाहतूक व्यवस्था विस्कळीत होवू नये यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त, निर्भया पथक व वाहतूक शाखेतील पथक व एक सर्व सोयीयुक्त रुग्णवाहिका रॅली दरम्यान सोबत असणार आहे. तरी या रॅलीमध्ये नागरीकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment