प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना  

तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

वाशिम दि.२६ (जिमाका) तालुका कृषी अधिकारी कार्यालय,वाशिमच्या वतीने २५ ऑगस्ट रोजी आत्मा कार्यालय वाशिम येथे प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेवर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या  प्रारंभी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.   
         याप्रसंगी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनेश बारापात्रे,कृषी उपसंचालक निलेश ठोंबरे,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी संशोधन प्रकल्प वाशिमचे प्रभारी अधिकारी भारत गीते, कृषी विज्ञान केंद्र करडा येथील कीटकशास्त्रज्ञ राजेश डवरे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम कार्यालयातील तंत्र अधिकारी श्री. धनोडे,श्रीमती लंगोटे, श्री दिलीप कंकाळ,वाशिम तालुका कृषी अधिकारी अनिल कंकाळ,कृषी अधिकारी प्रकाश कोल्हे, मंडळ कृषी अधिकारी उमेश राठोड, पी.एम.एफ एम.ई. जिल्हा समन्वयक श्री मुठाळ  यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री. ठोंबरे यांनी पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, श्री मुठाळ यांनी या योजनेअंतर्गत विविध उद्योग व त्याकरीता प्रकल्प अहवाल कसा तयार करावा याविषयी माहिती दिली.  
           डॉ. गीते यांनी तूर उत्पादन वाढीकरीता विविध उपाययोजनेबाबत मार्गदर्शन केले. कीड रोग व्यवस्थापन विषयी विज्ञान केंद्र करडाचे राजेश डवरे यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी ,शेतकरी उत्पादक कंपनीचे व महिला बचत गटाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन उमेश राठोड यांनी केले. तर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे वाशिम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे