29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन विविध स्पर्धा व खेळाडूंचा सत्कार



29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन

विविध स्पर्धा व खेळाडूंचा सत्कार

         वाशिम, दि. 24 (जिमाका) : हॉकीचे जादुगर माजी ऑलिंपीक खेळाडू स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिनानिमित्त 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या वतीने प्रभातफेरी, विविध खेळांचे आयोजन, खेळाडूंचा सत्कार आणि प्रात्याक्षीके आदी उपक्रम राबविले जाणार आहे. यामध्ये कबड्डीच्या स्पर्धा, कराटे प्रात्याक्षीक, आर्चरी स्पर्धा व राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच विविध स्पर्धांचे तसेच जिल्हा क्रीडा संकुलात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील ज्या खेळाडूंना वरील स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे व बालाजी शिरसीकर यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे