दिव्यांगांनी ऑनलाईन अर्ज केल्यावर संबंधित विशेषतज्ञाकडून तपासणी करावी बुधवार हा तपासणीचा दिवस निश्चित

दिव्यांगांनी ऑनलाईन अर्ज केल्यावर संबंधित विशेषतज्ञाकडून तपासणी करावी 

बुधवार हा तपासणीचा दिवस निश्चित 

वाशिम दि.२७ ( जिमाका) केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ संमत केला आहे. या कायद्यामध्ये प्रकरण १० मधील कलम ५६,५७ आणि ५८ नुसार २१ दिव्यांग प्रकारचा समावेश केला आहे. दिव्याने व्यक्तीने ऑनलाईन अर्ज केल्यानंतर शासकीय रुग्णालय, वाशिम येथे संबंधित विशेषतज्ञकडून तपासणी करणे आवश्यक आहे. या तपासणीकरिता बुधवार हा दिवस निश्चित करण्यात आला आहे.
      २१ प्रकारच्या दिव्यांग प्रकारांमध्ये दृष्टीदोष(अंधत्व), कर्णबधिरता, शारीरिक दिव्यंगता,मानसिक आजार, बौद्धिक दिव्यंगता,बहुदिव्यंगता, शारीरिक वाढ खुंटणे,स्वमग्नता,मेंदूचा पक्षघात,स्नायूंची विकृती, मज्जासंस्थेचे जुने आजार,अध्ययन अक्षमता,मल्टिपल स्क्लेरॉसिस,वाचा व भाषा दोष,थॅलेसेमिया, हिमोफिलिया,सिकलसेल डिसीज, ऍसिड अटॅक व्हीकटीम,पार्किनसन्स डिसीज,दृष्टीक्षीणता आणि कुष्ठरोग यांचा समावेश आहे.या आजाराच्या दिव्यांग प्रमाणपत्राकरिता लाभार्थ्यांनी ऑनलाईन www.swavalambancard.gov.in या संकेतस्थळावर IV(17) (1) मधील विहीत नमुन्यात अर्ज करावा व मोबाईल नंबर पुरवा म्हणून द्यावा लागेल.
          दिव्यांग व्यक्ती दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पुढील कागदपत्रे सादर करावे लागतील. ओळखीचा पुरावा, निवासाबाबतचा पुरावा व अर्जासोबत पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे सादर करावी.लाभार्थ्यांने दिव्यांगता दर्शविणारे पूर्ण छायाचित्र सादर करू नये.त्याने ऑनलाईन अर्ज केल्यानंतर शासकीय रुग्णालय,वाशिम येथे येऊन संबधित विशेषज्ञाकडून तपासणी करणे आवश्यक आहे.
        तपासणीकरीता बुधवार हा दिवस जिल्हा रुग्णालय,वाशिम येथे निश्चित करण्यात आला आहे.त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची विशेषतज्ञांकडून तपासणी झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या मोबाईलवर त्याचा UDID क्रमांक एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. एसएमएस आल्यानंतर www.swavalambancard.gov.in या संकेतस्थळावर जाऊन UDID क्रमांक टाकून प्रमाणपत्र डाउनलोड करावे.त्यासाठी रुग्णालयात गर्दी करण्याची आवश्यकता नाही.असे जिल्हा शल्य चिकित्सक,वाशिम यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे