संवाद उपक्रमांतर्गत सहाय्यक आयुक्त श्री. वाठ व कर्मचाऱ्यांचा वसतीगृह व निवासी शाळेत मुक्काम
- Get link
- X
- Other Apps
संवाद उपक्रमांतर्गत सहाय्यक आयुक्त श्री. वाठ व कर्मचाऱ्यांचा
वसतीगृह व निवासी शाळेत मुक्काम
वाशिम, दि. 01 (जिमाका) : समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतीगृह योजनेबाबत विदयार्थांकडून सोयी सुविधांबाबत तक्रारी केल्या जातात, प्रश्न उपस्थित केले जातात. याबाबत त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी समाज कल्याण आयुक्त, प्रशांत नारनवरे यांनी संवाद कार्यक्रम हा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी २८ जुलै रोजी जिल्हयातील मुलां-मुलींचे शासकीय वसतीगृहे व शासकीय निवासी शाळा येथे रात्रभर मुक्काम करुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी देखील वाशिम येथील गुणवंत शासकीय मुलांचे वसतीगृहात रात्रभर मुक्काम राहून स्वतः विद्यार्थ्यांसोबत संवाद साधुन त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा, जेवण व विद्यार्थ्यांमार्फत राबविण्यात येणारे उपक्रम याबाबत माहिती जाणुन घेतली. तसेच त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. वसतिगृहाच्या परिसरात श्री. मारोती वाठ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत देखील श्री. वाठ यांनी भोजन केले.
संवाद कार्यक्रम संकल्पनेने शासकीय वसतीगृहे व शासकीय निवासी शाळा येथील विद्यार्थी देखील भारावुन गेले. विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर गप्पा केल्या. विदयार्थ्यांच्या सूचना व मागणीनुसार त्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्याबरोबर विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी कौशल्य विकास कार्यक्रम व विविध तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करण्याबाबत श्री. वाठ यांनी यावेळी वसतीगृहाच्या गृहपाल यांने निर्देश दिले.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment