स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न



स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

रक्तदान शिबीर संपन्न

14 जणांनी केले रक्तदान

      वाशिम, दि. 10 (जिमाका) : स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या  संयुक्त वतीने आज १० ऑगस्ट रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हास्तरीय रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबीराच्या प्रारंभी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, रक्तपेढी प्रमुख डॉ. पी.एम. मोरे, वैद्यकीय समाजसेवक एस.के. दंडे व समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करुन पुष्पहार अर्पण केले.

         शिबीरात गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल एस.एस. इंगोले, गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहातील सुनिल इंगोले, नॅझरिन नर्सिंग कॉलेज हृदय अभ्यंकर, गौरव गवळी, गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहातील सुरज परांडे, श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वैभव जाधव, अभय काळे, सचिन काळे, आकाश गोटे, गजानन पोकळे, गणेश जांभरे, निखील राजोरे, छगन ठाकरे व सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील प्रमोद गायकवाड यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील सर्व कर्मचारी, ब्रिक्स इंडिया कंपनीचे सर्व कर्मचारी, शासकीय वसतीगृह व शासकीय निवासी शाळेतील सर्व कर्मचारी, श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय व श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे