मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती प्रलंबित अर्ज लॉगीनला विहीत मुदतीत सादर करा



मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती प्रलंबित अर्ज

लॉगीनला विहीत मुदतीत सादर करा

           वाशिम, दि. 23 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी महाडीबीटी प्रणालीवरील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क व इतर ऑनलाईन योजनांचे प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत कार्यान्वीत करण्यात आले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गाचे महाडिबीटी पोर्टलवरील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील हे अर्ज पुढील महाविद्यालयाचे स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे महाडिबीटी प्रणालीवरील डॅशबोर्डनुसार दिसून येते.

         मदर टेरेसा नर्सिंग कॉलेज, वाशिम, शिवशक्ती नर्सिंग इन्सटिटयुट, काटा, श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, वाशिम, गोदावरी मॉडर्न डिग्री कॉलेज, केनवड, सन्मती इंजिनियरिंग कॉलेज, सावरगांव बर्डे, पारेश्वर विद्यालय, पार्डी टकमोर, स्वामी विवेकानंद विद्यालय, कोकलगांव, स्व. अर्चनाताई चव्हाण अर्ट, कॉमर्स व श्री. मनोहरराव नाईक विज्ञान महाविद्यालय, कोंडाळा (महाली), शरदचंद्र पवार विद्यालय, सुपखेला व श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, वाशिम या संस्थेचे अर्ज प्रलंबित आहे.

           महाविद्यालयस्तरावरील प्रलंबित अर्जाची शासन निर्णयानुसार पडताळणी करुन सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज जिल्हा कार्यालयाचे लॉगीनला विहित मुदतीत ऑनलाईन पाठविण्याबाबत वेळोवेळी पत्राद्वारे, प्रसिध्दी पत्रकाद्वारे, ऑनलाईन दूरदृश्य प्रणालीव्दावरे व व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे सुचित करण्यात आले आहे.
          तरीही अद्याप सन 2021-22 या शैक्षणिक सत्रातील अनुसूचीत जाती प्रवर्गातील आपले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. सर्व कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायिक, बिगर व्यावसायिक, महाविद्यालयांना पुन:श्च सुचित करण्यात येते की, महाविद्यालयस्तरावरील सदर प्रलंबित अर्जाची पडताळणी करुन पात्र अर्ज तात्काळ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याणच्या लॉगीनला विहित मुदतीत ऑनलाईन पाठविण्यात यावे. जेणेकरून कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही. महाविद्यालयस्तरावरून अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याणच्यास्तरावर विहीत मुदतीत प्राप्त न झाल्यास व विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहील्यास याची सर्वस्वी जबादारी संबंधीत प्राचार्य व त्या महाविद्यालयाची राहील. असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे