स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश वाचकांसाठी जिल्हा ग्रंथालय कार्यालयात उपलब्ध
- Get link
- X
- Other Apps
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त
स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश वाचकांसाठी
जिल्हा ग्रंथालय कार्यालयात उपलब्ध
वाशिम, दि. 22 (जिमाका) : जिल्हयातील वाचनप्रेमी वाचकांना विदर्भ विभागातील स्वातंत्र्य सैनिकांचा दैदिप्यमान इतिहास जनसामान्यापर्यंत पोहचविण्याच्या दृष्टिने स्वातंत्र्य सैनिक यांचा चरित्रकोश विनामुल्य जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी यांचे निवासस्थानासमोर, विश्राम भवनाच्या मागील बाजूस वाचकांना वाचनासाठी ग्रंथालयीन वेळेत हे ग्रंथ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
वाचनप्रेमी जनतेला आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या अपूर्व त्याग व बलिदानाचा इतिहास कळावा. संस्कृतीचा व कर्तुत्वाचा गौरवशाली इतिहासाबरोबच जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात. देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमाणसात जीवंत रहावी, या उद्देशाने दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपुर्वक संस्मरण करण्यासाठी या ग्रंथांचा वाचकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आर.एच. कोलते यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment