एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान महाडिबीटी पोर्टलवर अर्ज आमंत्रित



एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

महाडिबीटी पोर्टलवर अर्ज आमंत्रित

फळे, फुले, मसाला पीक लागवड व जुन्या फळबागांचे होणार पुनरुज्जीवन

         वाशिम, दि. 25 (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या जुन्या बागांचे पुनरुज्जीवन या बाबींचा समावेश आहे. राज्यात विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या घटकांना देण्यात येणार अनुदान पुढीलप्रमाणे.

          कट फ्लॉवर्सकरीता- अल्प भुधारक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी अनुदान 1 लक्ष रुपये. एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार रुपये अनुदान प्रति हेक्टरी मर्यादा असणार आहे. इतर शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी अनुदान 1 लक्ष रुपये असून एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 25 हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान मर्यादा. कंदवर्गीय फुलांसाठी- अल्प भुधारक शेतकऱ्यांकरीता प्रति हेक्टरी अनुदान 1 लक्ष 50 हजार रुपये आहे. एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 60 हजार रुपये अनुदान प्रति हेक्टरी मर्यादा तर इतर शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी अनुदान 1 लक्ष 50 हजार रुपये असून एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 37 हजार 500 रुपये प्रति हेक्टर आहे. सुटी फुले करीता- अल्प भुधारक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी अनुदान 40 हजार रुपये आहे. एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 16 हजार रुपये अनुदान प्रति हेक्टरी मर्यादा. इतर शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी अनुदान 40 हजार रुपये असून एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 10 हजार रुपये प्रति हेक्टर आहे.

          बिया वर्गीय व कंद वर्गीय मसाला पिकांसाठी- प्रति हेक्टरी अनुदान 30 हजार रुपये आहे. एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 12 हजार रुपये अनुदान प्रति हेक्टरी मर्यादा. बहुवर्षिय पिकांसाठी- प्रति हेक्टरी अनुदान 50 हजार रुपये आहे. एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 20 हजार रुपये अनुदान प्रति हेक्टरी मर्यादा. विदेश फळपीक लागवडीकरीता- यामध्ये ड्रॅगनफ्रुट, अंजीर व किवीसाठी- प्रति हेक्टरी अनुदान 4 लक्ष रुपये आहे. एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लक्ष 60 हजार रुपये अनुदान प्रति हेक्टरी मर्यादा. स्ट्रॉबेरीसाठी- प्रति हेक्टरी अनुदान 2 लक्ष 80 हजार रुपये आहे. एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लक्ष 12 हजार रुपये अनुदान प्रति हेक्टरी मर्यादा. पॅशनफ्रुट, ब्लुबेरी, तेंदुफळ व अवॅकॅडोसाठी- प्रति हेक्टरी अनुदान 1 लक्ष रुपये आहे. एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार रुपये अनुदान प्रति हेक्टरी मर्यादा. जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवनासाठी- प्रति हेक्टरी अनुदान 40 हजार रुपये आहे. एकूण खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 20 हजार रुपये अनुदान प्रति हेक्टरी मर्यादा असणार आहे.

          तरी सर्व शेतकरी बांधवांनी विदेशी फळे, फुले, मसाला लागवड करण्यास अच्छुक व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी mahadbtmahait.gov.in या महाडीबीटीच्या पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे