नियोजन भवन येथे सामूहिक राष्ट्रगीत गायन
नियोजन भवन येथे
सामूहिक राष्ट्रगीत गायन
वाशिम दि.१७ (जिमाका) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य सप्ताहांतर्गत आज १७ ऑगस्ट रोजी नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन कार्यालय,मानव विकास समिती आणि सांखिकी कार्यालय यांच्या संयुक्त वतीने सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे,मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्री.नगराळे,श्री. जायभाये,संशोधन सहाय्यक श्री.पानगे, श्री.आव्हाड, सांख्यिकी सहाय्यक श्री.कुमरे, श्री.साळी,श्री.हेंद्रे,श्री.अवचार, श्री.फुके, श्री.हेंद्रे व शिपाई सुनील धानोरकर यांनी सामूहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रमात सहभाग घेतला.
Comments
Post a Comment