जिल्हाधिकाऱ्यांकडून तोंडगाव परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांकडून तोंडगाव परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी 

वाशिम दि.०९(जिमाका) जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी ८ ऑगस्ट रोजी वाशिम तालुक्यातील तोंडगाव परिसरात अतिवृष्टीमुळे चंद्रभागा नदीला आलेल्या पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची आणि पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी वाशिम तहसीलदार श्री.साळवे प्रामुख्याने उपस्थित होते. 
         जिल्हाधिकारी श्री षण्मुगराजन यांनी चंद्रभागा नदीला पूर असल्यामुळे नदीच्या अलीकडील काठावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली.तोंडगाव येथील एका गर्भवती महिलेला बाळंतपणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यासाठी नदीला पूर असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका २० किमी अंतरावरून कन्हेरगाव मार्गावरुन पाठवून त्या महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांच्या सूचनेवरून करण्यात आली.नदीला पूर असताना कोणीही प्रवाहातून रस्ता ओलांडू नये अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केल्या. पुरामुळे कोणतीही जीवित हानी होणार नाही याकडे प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना तालुका प्रशासनाला यावेळी त्यांनी दिल्या.पुरामुळे झालेल्या नुकसानीची यावेळी त्यांनी पाहणी केली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे