जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सामुहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात
- Get link
- X
- Other Apps
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे
सामुहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात
वाशिम, दि. 17 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज 17 ऑगस्ट रोजी स्वराज्य सप्ताहअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सकाळी 11 वाजता सामुहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात संपन्न झाले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी संजय पांडे, मिलींद काटोलकर, संजय फुफाटे, पलटन नायक होमगार्ड एल.डी. रामटेके, स्काऊट गाईडच्या जिल्हा समन्वयक प्रिती गोल्हर, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे, बालाजी शिरसीकर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कलीम मिर्झा, शुभम कंकाळ तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील खेळाडू, स्काऊट गाईड व होमगार्ड कार्यालयातील कर्मचारी या समुह राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment