प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत ई-केवायसी प्रक्रीया पुर्ण करावी



प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत ई-केवायसी प्रक्रीया पुर्ण करावी

         वाशिम, दि. 22 (जिमाका) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण १ लक्ष ८९ हजार ३४४ लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. अद्यापपर्यंत जिल्ह्यात एकूण १ लक्ष २१ हजार ६०८ लाभार्थ्यांनी ही ई-केवायसी पूर्ण केलेली आहे. अजुनही ६७ हजार ७३६ लाभार्थी शेतकरी ई-केवायसी पूर्ण करणे बाकी आहे.

           ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कॉमन सर्विस सेंटर (सीएससी)/ आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे आधारकार्ड व आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक घेऊन जाणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांचा आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक नसेल, त्यांनी आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी) यांच्याकडे आधारकार्ड आणि उपलब्ध असलेला दुसरा मोबाईल क्रमांक घेऊन जाणे आवश्यक आहे. याशिवाय स्वतः लाभार्थ्याला कोणत्याही ॲन्ड्रॉईड मोबाईलवरूनही आधार ई-केवायसी करता येण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

           शेतकऱ्याला स्वतः ई-केवायसी करता येईल, यासाठी सुरुवातीला google crome मध्ये जावे.
fw.pmkisan.gov.in  हे संकेतस्थळ टाकावे. उजव्या हाताला थोडे खालच्या बाजूस Farmer Corner च्या खाली        e-KYC वर Click करावे. त्यानंतर आधार क्रमांक टाकावा. search या बटणावर Click करावे. त्यानंतर आधार क्रमांक आणि आधार कार्डसोबत लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकावा. यानंतर Get Mobile OTP बटणावर Click करावे. मोबाईलवर प्राप्त झालेला चार अंकी OTP टाकावा, Submit OTP चे बटण दाबावे. त्यानंतर Get Aadhar OTP या बटणावर Click करावे. मोबाईलवर प्राप्त झालेला सहा अंकी OTP Aadhar Registered mobile OTP या रकान्यात टाकावा. त्यानंतर Submit हे बटण दाबावे. हिरव्या रंगात e-KYC यशस्वीपणे पूर्ण झाल्याचा संदेश आपणास मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल.

           अशाप्रकारे ई-केवायसी अपुर्ण असलेल्या शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट 2022 पूर्वी ही प्रक्रीया पुर्ण करावी. ही केवायसी पुर्ण केल्याशिवाय शेतकऱ्यांना माहे ऑगस्ट 2022 नंतरचे अनुदान हप्ते मिळणार नाही. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे