भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांच्या हस्ते अमृत महोत्सवी ध्वजारोहण


भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा 

जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांच्या हस्ते अमृत महोत्सवी ध्वजारोहण 

          वाशिम, दि. 15 (जिमाका) : १५ ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा वर्धापन दिन जिल्हाधिकारी कार्यालय असलेल्या प्रशासकीय इमारत येथे उत्साहात साजरा करण्यात आला.     

       जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते सकाळी ९.०५ वाजता अमृत महोत्सवी ध्वजारोहण करण्यात आले. या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर जिल्हाधिकारी शहाजी पवार व निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

         भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त " घरोघरी तिरंगा " या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय असलेली प्रशासकीय इमारत व परिसर सजविण्यात आला होता. ध्वजारोहण समारंभ प्रसंगी पोलीस पथक व पोलीस बँड पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

       यावेळी वीर पत्नी पार्वताबाई लहाने, शांताबाई सरकटे, उपजिल्हाधिकारी सर्वश्री संदीप महाजन, नितीन जाधव, सुहासिनी गोणेवार, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख शिवाजी भोसले, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री लोखंडे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारुती वाठ, कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज व वाशिमचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, माजी सैनिक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मोहन शिरसाट यांनी केले.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे