घरोघरी तिरंगा ” जनजागृतीसाठी 12 ऑगस्टला विद्यार्थ्यांची प्रभातफेरी
- Get link
- X
- Other Apps
“ घरोघरी तिरंगा ” जनजागृतीसाठी
12 ऑगस्टला विद्यार्थ्यांची प्रभातफेरी
वाशिम, दि. 10 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याला 15 ऑगस्ट रोजी 75 वर्ष पुर्ण होत आहे. त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत प्रत्येक घरावर सलग तीन दिवस राष्ट्रध्वज फडकणार आहे. या उपक्रमासाठी पालक आणि नागरीक यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी येत्या 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 ते 11 वाजता दरम्यान स्थानिक नियोजनानुसार विद्यार्थ्यांची प्रभातफेरी प्रत्येक गावात काढण्यात येणार आहे. प्रभातफेरीत शाळेतील विद्यार्थी व शिक्षक सहभागी होतील. विद्यार्थी या प्रभातफेरी दरम्यान विविध घोषणा देवून जनजागृती करतील. विद्यार्थ्यांच्या हाती विविध घोषवाक्य असलेले फलक राहणार आहे. जिल्हयातील सर्व शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी 12 ऑगस्ट रोजी आपल्या गावात प्रभातफेरी काढून पालक व नागरीकांमध्ये जनजागृती करावी. असे आवाहन शिक्षणाधिकारी रमेश तांगडे यांनी केले आहे.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment