शेतकऱ्यांनी पीक नुकसानीबाबत कंपनीच्या समन्वयकांशी संपर्क साधावा



शेतकऱ्यांनी पीक नुकसानीबाबत

कंपनीच्या समन्वयकांशी संपर्क साधावा

         वाशिम, दि. 23 (जिमाका) : खरीप हंगाम सन 2022 या वर्षात पीकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी कृषी विमा कंपनी ऑफ इंडियाच्या जिल्हयातील तालुका समन्वयकांशी संपर्क साधावा. तालुका समन्वयक, त्यांचे नांव, भ्रमणध्वनी क्रमांक व तालुका पुढील प्रमाणे आहे. वाशिम तालुका- परमेश्वर विभुते (8459252717) ऑफीस क्रमांक 8, बुस्केटवार कॉम्प्लेक्स, नवोदय विद्यालयाजवळ, काटा रोड, वाशिम. कारंजा तालुका- भुषण शिकारे, (9766969394) लाला बापु कॉम्प्लेक्स, धाबेकर कॉलेजसमोर कारंजा. मालेगांव तालुका- नितेश वाघ (9158231791) गोयंका नगर, महाराष्ट्र बँकेजवळ, मालेगांव. मंगरुळपीर तालुका- गोपाल नवघरे (9881812113) संजिवनी सोसायटी, संभाजीनगर, बायपास रोड, मंगरुळपीर. मानोरा तालुका- देविदास शिंदे (9146927137), सेवालाल कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेजवळ, मानोरा आणि रिसोड तालुका- श्रीकृष्ण ढाकणे (8698491195), समर्थनगर, सिव्हील लाईनरोड, बँक ऑफ महाराष्ट्रजवळ, रिसोड या भ्रमणध्वनीवर तसेच दिलेल्या कार्यालयाच्या पत्यावर संबंधित तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक नुकसानीबाबत संपर्क साधावा. असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे