प्रसाद व अन्नदानासाठी अधिनियमातील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक सार्वजनिक गणेश मंडळांना अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन



प्रसाद व अन्नदानासाठी

अधिनियमातील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक

सार्वजनिक गणेश मंडळांना

अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

         वाशिम, दि. 30 (जिमाका) : ३१ ऑगस्टपासुन गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेश उत्सवानिमित्त विविध मंडळामार्फत भंडारा प्रसाद, अन्नदान इत्यादी कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने जिल्हयातील सर्व सार्वजनिक धार्मिक उत्सव मंडळे, त्यांचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन व वितरण करणारे अन्न व्यावसायीक यांनी अन्न, सुरक्षा व मानके अधिनियमानुसार तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे. असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

         प्रसाद वितरण करणाऱ्या मंडळांनी अन्न सुरक्षा कायद्यानुसार www.foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करुन प्रतिवर्ष १०० रुपये शुल्क भरावे व नोंदणी प्रमाणपत्र घेण्यात यावे. प्रसाद तयार करतांना उत्पादनाची जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी. प्रसादासाठी लागणारा कच्चा माल अन्नपदार्थ परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायीकांकडून खरेदी करावा. प्रसाद बनविणाऱ्या केटरर्सची माहिती अद्यावत करुन ठेवावी. प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ, आरोग्यदायी व झाकण असलेली असावी. आवश्यक तेवढ्याच प्रसादाचे उत्पादन करावे. उरलेल्या शिळे अन्नपदार्थांची योग्य रीतीने विल्हेवाट लावावी. प्रसाद उत्पादन व वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठल्याही संसर्गजन्य रोगापासून मुक्त असावा. लोकांच्या आरोग्याच्यादृष्टीने वरील मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी वरील सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन सहायक आयुक्त (अन्न) व पदावधीत अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग, अकोला यांनी केले आहे.

                                                                                                                                        *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे