तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत व्यापक जनजागृती करावी षण्मुगराजन एस.
- Get link
- X
- Other Apps
तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत व्यापक जनजागृती करावी
तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सभा
वाशिम, दि. 25 (जिमाका) : शाळा तसेच शासकीय कार्यालयाच्या इमारत परिसरात कोणताही कर्मचारी किंवा कामानिमित्ताने येणारा व्यक्ती हा गुटखा व तंबाखू खाऊन धुम्रपान करणार नाही याची दक्षता घ्यावी. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती देऊन त्यांच्यामध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात 24 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आयेाजित सभेत अध्यक्षस्थानावरुन श्री. षण्मुगराजन बोलत होते. सभेला जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. आदित्य पांढारकर, वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे प्रतिनिधी श्री. ठोंबरे, कामगार विभागाच्या श्रीमती खोंड, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. आगलावे, पोलीस उपनिरीक्षक श्री. जाधव, समुपदेशक राम सरकटे व सामाजिक कार्यकर्ता रामकृष्ण धाडवे यांची उपस्थिती होती.
श्री. षण्मुगराजन म्हणाले, तंबाखू सेवानाच्या हानिकारक परिणामाबाबत जागरुकता निर्माण करावी. शाळांच्या परिसरात तंबाखू, गुटखा व तंबाखूजन्य वस्तूंची विक्री होणार नाही याची खबरदारी घ्यावी. शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यासाठी सचित्र माहिती देणारे मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करुन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात यावे. जे विद्यार्थी तंबाखू व गुटखा खातात त्यांना वैयक्तिकरित्या स्वतंत्र खोलीमध्ये बोलावून त्यांना तंबाखूचे दुष्परिणाम व त्याचे आरोग्यावर होणारे विपरीत परिणामांची माहिती व्यसनग्रस्त विद्यार्थ्याला देऊन त्याला या व्यसनातून मुक्त करावे. तंबाखूमुळे कर्करोग होतो याची जाणीव विद्यार्थ्यांना करुन दयावी. नगर पालिकेने आपल्या क्षेत्रात कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. जे विद्यार्थी तंबाखू हे व्यसन सोडण्यास इच्छुक आहे, त्यांचे प्रभावीपणे समुपदेशन करुन त्यांना या व्यसनातून मुक्त करावे. असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
यावेळी कार्यक्रमाचे समुपदेशक श्री. सरकटे यांनी तंबाखू सेवनाच्या हानीकारक परिणामाबाबत जागरुकता निर्माण करणे तंबाखू उत्पादन व पुरवठा नियंत्रण करणे, अंमलबाजवणी आणि तंबाखू नियंत्रण व प्रतिबंधक कायद्याच्या तरतूदीची खात्री करणे, सिगारेट व तंबाखूचा वापर त्याच्या प्रचार-प्रसारावर बंदी घालण्यात यावी. सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 अंतर्गत असलेल्या विविध कलमाची अंमलबजावणी व जिल्हयातील सर्व शाळा, महाविद्यालये तंबाखूमुक्त करणे हे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे उदिष्ट असल्याचे सांगीतले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment